राज्यात पवार अन् ठाकरेंची दडपशाही, पोलिस बंदोबस्तातच सोमैय्या मुंबईकडे रवाना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 12:42 PM2021-09-20T12:42:59+5:302021-09-20T12:43:58+5:30

कराडातील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले, आप्पासाहेब नलावडे सहकारी साखर कारखान्यात मुश्रीफांनी शंभर कोटींचा घोटाळा केला असून त्याची चौकशी होणे अपेक्षित आहे.

Sharad Pawar And uddhav thakare's repression in the state, Somaiya left for Mumbai under police protection | राज्यात पवार अन् ठाकरेंची दडपशाही, पोलिस बंदोबस्तातच सोमैय्या मुंबईकडे रवाना

राज्यात पवार अन् ठाकरेंची दडपशाही, पोलिस बंदोबस्तातच सोमैय्या मुंबईकडे रवाना

Next
ठळक मुद्देकराडातील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले, आप्पासाहेब नलावडे सहकारी साखर कारखान्यात मुश्रीफांनी शंभर कोटींचा घोटाळा केला असून त्याची चौकशी होणे अपेक्षित आहे.

कराड : कोल्हापुरला निघालेले भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना सोमवारी पहाटे कराडात पोलिसांनी स्थानबद्ध केले. त्यानंतर सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत सोमय्या यांनी ठाकरे, पवार आणि मुश्रीफांवर गंभीर आरोप केले. काहीही झाले तरी मुश्रीफांचे घोटाळे बाहेर काढणार असल्याचे सांगून त्यांनी हे सरकार ठोकशाही करीत असल्याचा आरोप केला. दरम्यान, पत्रकार परिषदेनंतर किरीट सोमय्या पोलीस बंदोबस्तात पुन्हा मुंबईला रवाना झाले. यावेळी शहरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

कराडातील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले, आप्पासाहेब नलावडे सहकारी साखर कारखान्यात मुश्रीफांनी शंभर कोटींचा घोटाळा केला असून त्याची चौकशी होणे अपेक्षित आहे. पुढच्या आठवड्यात हसन मुश्रीफांचा आणखी एक घोटाळा मी समोर आणणार आहे. मी अर्थमंत्रालय, आयकर खात्याचे अध्यक्ष, ईडीचे संचालक, सहकार मंत्रालयामध्ये २ हजार ७०० पानांचे पुरावे दिलेत. त्यावर चौकशी सुरु झाली असून मी अधिक माहिती मागवली आहे ती माहिती दोन दिवसांत मला मिळेल. ईडी आणि संचालक मंडळाकडून याची चौकशी सुरु आहे. त्या भीतीनेच राष्ट्रवादीचे गुंड माझ्यावर हल्ला करीत आहेत. हसन मुश्रीफांच्या स्वागतासाठी जनसमुदायाला परवानगी दिली जाते. मग, मला कोल्हापुरात येण्यास परवानगी का नाही? सध्या या प्रकरणावरून लक्ष वळवण्यासाठी शरद पवारांनी एक व्यूहरचना आखली आहे. मात्र, त्याचा काहीही परिणाम होणार नाही. मी मुश्रीफांचे घोटाळे बाहेर काढणारच आहे.

ठाकरे आणि पवारांची राज्यात दडपशाही सुरू आहे. त्यांच्याविरोधात कोणी गेल्यास ते त्याला दडपून ठेवण्याचा, अडवून ठेवण्याचा प्रयत्न करतात. पवारांनी आता या प्रकरणातून लक्ष हटविण्यासाठी नवी व्युहरचना आखली आहे. मात्र, त्याचा काहीही उपयोग होणार नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी मला मुश्रीफांचे घोटाळे बाहेर काढण्यास सांगीतले असून घोटाळ्याचे पुरावे मंगळवारी ‘ईडी’कडे देणार असल्याचेही सोमय्या यावेळी म्हणाले.
 

Web Title: Sharad Pawar And uddhav thakare's repression in the state, Somaiya left for Mumbai under police protection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.