शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

मुंबईतलं सगळं नीटनेटकं करतो : शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 12:12 AM

कºहाड : ‘तुम्ही उसाचं वजन कसं वाढंल, याची चर्चा करा. मुंबईत सध्या काय चाललंय, त्याची चर्चा करत बसू नका. ...

कºहाड : ‘तुम्ही उसाचं वजन कसं वाढंल, याची चर्चा करा. मुंबईत सध्या काय चाललंय, त्याची चर्चा करत बसू नका. मी ते सगळं नीटनेटकं करतो. त्याची काळजी करू नका. फक्त आमदार बाळासाहेब पाटील यांना तेवढं इथल्या जबाबदारीतून मुक्त करा,’ असे सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकप्रकारे राज्यात आपलेच सरकार येणार, असा विश्वास व्यक्त केला. तर बाळासाहेब पाटील यांच्या मंत्रिपदाचे संकेतही त्यांनी दिले.यशवंतनगर, ता. कºहाड येथील सह्णाद्री सहकारी साखर कारखान्याचा ४६ वा गळीत हंगाम प्रारंभ शरद पवार यांच्या हस्ते सोमवारी पार पडला. यावेळी सह्णाद्री कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटनही पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. खासदार श्रीनिवास पाटील अध्यक्षस्थानी होते. तर माजी सहकारमंत्री डॉ. एन. डी. पाटील यांची प्रमुख उपस्थित होती.शरद पवार म्हणाले, ‘आपण शेतीकडे व्यवसाय म्हणून बघितले पाहिजे; पण आता शेतकऱ्यांच्या सगळ्याच पोरांनी शेती करण्याचे दिवस राहिलेले नाहीत. जमिनीचे तुकडे होत चालल्याने शेतकऱ्यांच्या मुलांनी इतर व्यवसायाकडेही वळले पाहिजे.’खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, ‘सह्याद्री’वर येता घाला, सह्यगिरी हा धावून गेला’ हा यशवंतराव चव्हाणांचा इतिहास आहे. तोच कणखर बाणा आज शरद पवारांच्या रुपाने आपल्याला पाहायला मिळत आहे.’आमदार बाळासाहेब पाटील म्हणाले, ‘आम्ही मंडळी दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने जाणारी आहोत. तो विचार पुढे नेण्याचे काम शरद पवार करीत आहेत. त्यामुळे आम्ही त्यांची साथ कदापि सोडणार नाही. आम्हालाही सत्तेची स्वप्ने दाखविली गेली होती; पण आम्ही विचारापासून ढळणार नाही.’कार्यक्रमाला आमदार मोहनराव कदम, प्रभाकर देशमुख, अरुण लाड, सत्यजित पाटणकर, राजेश पाटील-वाठारकर, नितीन पाटील, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष सुनील माने, रावसाहेब पाटील, नितीन पाटील यांच्यासह साखर कारखान्याचे सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी स्वागत केले. आमदार बाळासाहेब पाटील यांनी प्रास्ताविक केले.बक्षीस घ्यायचा कंटाळा येत नाही?सह्याद्री सहकारी साखर कारखाना हा अतिशय उत्तम चाललेला कारखाना आहे. त्यामुळे प्रत्येकवर्षी त्याला शासनाचा कोणता ना कोणतातरी पुरस्कार मिळतच असतो. बºयाचदा पुरस्कार वितरणाला मीच असतो. तेव्हा एकदा मी बाळासाहेब पाटील यांना म्हटलं की, ‘तुम्हाला बक्षीस घ्यायचा कंटाळा येत नाही का? जरा दुसºयांना मिळू द्या...’ त्यावर एकच खसखस पिकली.