शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

शरद पवारांमागे साताऱ्यातील सर्वसामान्य, पण राजेंनी सोडली साथ

By दीपक शिंदे | Published: July 05, 2023 5:28 PM

अगोदर शिवेंद्रसिंहराजे नंतर उदयनराजे आणि आता रामराजे

दीपक शिंदेसातारा : नव्या राजकीय प्रवासाची सुरुवात साताऱ्यातून करताना शरद पवारांनी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन गुरुदर्शन घेतले. पण, त्यांचीच काही तत्त्वे अंमलात न आणल्यामुळे त्यांच्यापुढे काही अडचणी निर्माण झाल्या. काळानुसार त्यांनी घेतलेले निर्णय गरजेचे असतीलही, पण त्याचा फटका पक्षाला बसला हे मात्र नक्की. यशवंतराव चव्हाण यांनी राजघराण्याला सत्तेपासून लांब ठेवले होते. सर्वसामान्यांमध्ये सत्ता असली पाहिजे असे त्यांना वाटत होते. पण, शरद पवारांनी राजघराण्याचे जनमानसातील वाढलेले महत्त्व लक्षात घेता राजघराण्यात सत्ता दिली. आता हेच राजे पवारांना सोडून इतर पक्षात गेल्याने राष्ट्रवादीमध्ये पोकळी निर्माण झाली आहे.दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी सत्तेचे विकेंद्रीकरण करताना सर्वसामान्य कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे अशी भूमिका घेतली होती. त्यामुळेच त्यांनी काँग्रेसमध्ये फार मोठी घराणेशाही करण्याचा प्रयत्न केला नाही. किसन वीर, यशवंतराव मोहिते, बाळासाहेब देसाई, प्रतापराव भोसले, लक्ष्मणराव पाटील यांना सत्तेच्या प्रवाहात सहभागी करून घेतले. जाणीवपूर्वक राजघराण्यांना बाजूला ठेवले. फलटणचे निंबाळकर घराणे राजकारणात असले तरी मालोजीराजे यांच्यानंतर काहीकाळ पोकळी निर्माण झाली होती.साताऱ्यातील राजघराणी लांब जाण्यास केवळ त्यांचाच दोष आहे असेही नाही. तर, शरद पवारांनीदेखील दोन्ही दगडांवर हात ठेवून राजकारण करण्याचा प्रयत्न केला. राजघराण्यांना पक्षात सहभागी करून घेतले तरी सत्तेत सहभागी करून घ्यायला त्यांची फारशी मानसिकता नव्हती. त्यामुळे दिवंगत अभयसिंहराजे भोसले यांना सत्तेत सहभागी करून घेतले तरीदेखील फारशी महत्त्वाची पदे मिळाली नाहीत.कोल्हापूरचे राजे पक्षात आले अन् परत गेलेशरद पवार यांनी संभाजीराजे छत्रपती यांना लोकसभेसाठी उमेदवारी देऊन पक्षात घेतले. राजघराण्यांचा सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी वापर करता येईल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा जनाधार वाढविता येईल यासाठी त्यांचा हा प्रयत्न होता. पण, राष्ट्रवादीमध्ये ते रमले नाहीत. लोकसभेसाठी त्यांचा पराभव झाला आणि भाजपने त्यांना राज्यसभेवर घेतल्याने त्यांनी राष्ट्रवादी सोडली.

शिवेंद्रसिंहराजे, उदयनराजे अन रामराजेराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तीनही राजे असल्याने जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात होता. त्याला इतरांचीही साथ मिळत होती. पण, पक्षांतर्गत धुसफुस वाढली. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा राष्ट्रवादीकडून फारसा विचार होईना. अजित पवारांनी शब्द दिला तरी शरद पवार ताकद देईनात म्हटल्यावर शिवेंद्रसिंहराजेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम केला. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत निवडून येऊनही उदयनराजेंनी भाजपचाच झेंडा हातात घेतला. रामराजेंना तर शरद पवारांनी सर्वकाही दिले, पण अखेर तेही सोबत राहिले नाहीत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेShivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसलेRamraje Naik-Nimbalkarरामराजे नाईक-निंबाळकर