सातारा : सर्व जातिधर्माच्या गोर-गरीब रयतेला शिक्षणाची कवाडे खुली करून देणारे थोर समाजसुधारक तथा रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची ६५ वी पुण्यतिथी गुरुवारी (दि. ९) सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यालयात साजरी करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मृतिस्थळास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.याप्रसंगी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील, विश्वजीत कदम, संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, व्हॉईस चेअरमन भगीरथ शिंदे, संघटक डॉ. अनिल पाटील, सचिव विकास देशमुख, आ. सुमन पाटील, भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, प्रभाकर देशमुख यांच्यासह रयत सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साताऱ्यात कर्मवीर भाऊराव पाटील यांना आदरांजली, शरद पवार यांची उपस्थिती
By सचिन काकडे | Updated: May 9, 2024 11:27 IST