क-हाड (जि. सातारा) : राष्ट्रवादीचे माजी खासदार, सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार रविवारी क-हाडात अचानक दाखल झाले. राज्यपालांचा सत्कार केल्यानंतर पवार यांनी त्यांच्याशी कमराबंद चर्चा केली. पवार यांची ही भेट आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा मतदारसंघात चर्चेची ठरली आहे.साताºयाचे विद्यमान खासदार उदयन राजे भोसले यांचे आणि राष्टÑवादी काँग्रेसच्या नेत्यांचे फारसे सख्य नाही. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्याशी खा. उदयनराजेंचे पटत नाही. शिवाय, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी असलेले त्यांचे ‘सख्य’ तर जगजाहीर आहे. अशा परिस्थितीत शरद पवार नव्या उमेदवाराची चाचपणी करत असून श्रीनिवास पाटील यांच्याशाी बंदद्वार झालेली चर्चा हा त्याचाच भाग असल्याचे मानले जात आहे.पृथ्वीराज चव्हाण यांनीही घेतली भेटराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे राज्यपाल पाटील यांच्या निवासस्थानातून बाहेर पडल्यानंतर काही वेळाने माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी वाढदिवसानिमित्त श्रीनिवास पाटील यांचा सत्कार केला. यावेळी त्या दोघांमध्ये चर्चाही झाली.
शरद पवार-श्रीनिवास पाटील यांच्या भेटीने चर्चेला उधाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 2:42 AM