शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

महिलांचे तिखट शब्द... अन् पुरुषांची वाकडी नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 12:47 AM

आपल्यावरील अत्याचाराविषयी बोलताना म्हणाली, ‘आम्ही शरीराने पुरुष असलो तरीही मनाने महिला आहे, असं कोणाला सांगितलं की पहिल्यांदा आम्हाला चिडवलं जातं. त्यानंतर जवळच्या नातेवाइकांकडूनच आमच्यावर शारीरिक अत्याचार केला जातो. याविषयी कुठंही आवाज उठविला तर आम्हालाच गप्प बसवतात. विशेष म्हणजे आम्हाला यासाठी परावृत्त करण्यासाठी कुटुंबीयांकडूनच मोठ्या प्रमाणावर भावनिक अत्याचार केला जातो.’

ठळक मुद्देतृतीयपंथीयांची खंत : निसर्गानं जसं जन्माला घातलं तसंच स्वीकारण्याची आर्त हाकअस्वस्थ जाणिवा

प्रगती जाधव-पाटील ।सातारा : महिला खूप कोमल मनाच्या असल्या तरीही त्यांचे शब्द टोकाचे तिखट आणि मानसिक खच्चीकरण करणारे असतात. एकही वाकडा शब्द न बोलणाऱ्या पुरुषांची आमच्या अंगावर खेळणारी नजर त्रासदायक असते. निसर्गानं जसं आम्हाला जन्माला घातलं तसंच आम्हाला स्वीकारा, इतकी माफक अपेक्षा तृतीयपंथी व्यक्त करत आहेत.

समाजात वावरताना तृतीयपंथी म्हणून हेटाळणी, व्यक्तिगत पातळीवर होणारी चेष्टा आणि खासगीत होणारे अत्याचार याविषयी तक्रार करण्यासाठी त्यांना कायद्यातही अद्याप ठोस मार्ग नाही. तृतीयपंथीयांवर होणाºया शारीरिक आणि मानसिक छळवणुकीसाठी स्वतंत्र कायदा अस्तित्वात नसल्यामुळे त्यांची अनेक पातळ्यांवर कोंडी होत आहे.तृतीय पंथीयांना कायदेशीर मान्यता मिळाल्यानंतरही समाजात त्यांच्याविषयीची स्वीकृती भावना आढळून येत नाही. तृतीयपंथी म्हटलं की भडक मेकअप, मोठ्या आवाजात टाळी वाजवणारे आणि दहशत माजवून पैसे वसूल करणारे अशी त्यांची प्रतिमा समाजात आहे. सरसकट तृतीयपंथी असे नाहीत; पण एखाद्याचं असं वर्तन त्यांच्याविषयी समाजाची नजर बदलायला पूरक ठरते.

आपल्यावरील अत्याचाराविषयी बोलताना म्हणाली, ‘आम्ही शरीराने पुरुष असलो तरीही मनाने महिला आहे, असं कोणाला सांगितलं की पहिल्यांदा आम्हाला चिडवलं जातं. त्यानंतर जवळच्या नातेवाइकांकडूनच आमच्यावर शारीरिक अत्याचार केला जातो. याविषयी कुठंही आवाज उठविला तर आम्हालाच गप्प बसवतात. विशेष म्हणजे आम्हाला यासाठी परावृत्त करण्यासाठी कुटुंबीयांकडूनच मोठ्या प्रमाणावर भावनिक अत्याचार केला जातो.’

 

  • शाळेत नपुसकलिंगही शिकवा...!

शालेय अभ्यासक्रमात स्त्रीलिंग, पुल्लिंग आणि नपुसकलिंग अशी तीन लिंग शिकवली जातात. पाठ्यक्रम जसा पुढं जाईल तसं स्त्रीलिंग आणि पुल्लिंग राहतं, नपुसकलिंग अगदीच दुर्लक्षित होतं. शालेय अभ्यासक्रमात असलेल्या नपुसकलिंगाची शिकवण बालवयातच दिली गेली तर समाजात आमची होणारी हेटाळणी टळू शकते, असे मत सुधा पाटील यांनी व्यक्त केले.

 

  • कुटुंबाकडून तीव्र विरोध

दोन किंवा तीन मुलींनंतर पालकांच्या पोटी मुलगा म्हणून जन्माला आल्यानंतर म्हातारपणाची काठी म्हणून त्यांना वाढविण्यात येते. वयाच्या चौदाव्या वर्षापर्यंत मुलांबरोबर वावरल्यानंतर आपल्यात महिला सुलभ भावना असल्याचे समजल्यानंतर याविषयी मोकळेपणाने बोलण्याची व्यवस्था समाजरचनेत नाही. कुटुंबात याविषयी चर्चा केली तर तीव्र विरोध आणि मानसिक छळ करण्यात येते. पालकांच्या अपेक्षा आणि व्यक्ती स्वांतत्र्य या दुुहेरी कचाट्यात अडकल्याने आयुष्य संपविण्याचाही विचार मनात येतो.

 

मला नर्सिंगचे शिक्षण घ्यायचे आहे. हे शिक्षण फक्त स्त्रियांना दिले जाते, असे संस्थेचे म्हणणे आहे. मी शरीराने पुरुष असलो तरी मनाने बाई आहे; पण माझ्या बाई असण्याचा शारीरिक पुरावा देण्यासाठी मी असमर्थ आहे.- आर्या पुजारी, सातारा

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरsexual harassmentलैंगिक छळ