मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी सातारा जिल्ह्यातील माजी मंत्री शशिकांत शिंदे यांची नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती आहे. नुकत्यात राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीत शिंदे यांच्या नावावर पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सहमती दर्शविली असल्याचे समजते.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा मंत्रिमंडळात जलसंपदामंत्री म्हणून समावेश झाला आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपद हे पक्षातील अन्य नेत्यांकडे द्यावे अशी सूचना पुढे आली. त्यानंतर विविध नावांवर चर्चा झाली. यापूर्वी जितेंद्र आव्हाड आणि भास्कर जाधव यांनी पक्षाचे कार्याध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. जाधव शिवसेनेत गेले आहेत तर आव्हाड यांना मंत्रीपद मिळणार असल्याने त्यांचे नाव मागे पडले. राष्टÑवादीचे फायरब्रँड नेते अशी ओळख असलेले धनंजय मुंडे यांना प्रदेशाध्यक्ष करावे, अशी काही जणांची मागणी होती. मात्र, त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे. शशिकांत शिंदे हे अगदीच थोड्या मतांनी विधानसभेत पराभूत झाले. शरद पवार यांचे विश्वासू म्हणून ते ओळखले जातात.