शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
2
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
5
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
6
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
7
शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!
8
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
9
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
10
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
11
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
12
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
13
नाशिकमध्ये येऊन गेले सर्वपक्षीय दिग्गज नेते; राष्ट्रीय नेतृत्वापासून सर्वोच्च नेत्यांच्या प्रचारसभा
14
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
15
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
16
NTPC Green Energy IPO: आजपासून ₹१०००० कोटींचा IPO गुंतवणूकीसाठी खुला, काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...
17
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा
18
गाजरांमुळे अमेरिकेत भीतीचं वातावरण! सर्व स्टोअरवरून परत मागवले; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
19
दिल्लीत विषारी धुके, ट्रकला प्रवेशबंदी, प्रकल्पांची कामेही स्थगित
20
सलमानसमोर बोलती बंद, आता Bigg Boss 18 मधून बाहेर आल्यावर अश्नीर ग्रोव्हर काय म्हणाला?

जंगलातून शाळेत जाताना चिंधी ठरली दिशादर्शक - पळ्याचा वाडा शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 12:41 AM

एकीकडे फलटण तालुक्यातील उजाड माळरानातून थेट किर्रर्र झाडी असलेल्या भागातील डोंगरावरील शाळा... पावसाळ्यात डोक्यावर कोसळणारा पाऊस आणि पायाखालची लाल सटकणारी माती... त्यात घनदाट झाडीमुळे रोज जंगलात वाट चुकणं... समोर आलेल्या या परिस्थितीला आव्हान म्हणून त्यांनी स्वीकारलं आणि लढायचं ठरवलं. जिथून आपण

ठळक मुद्देकोसळणाऱ्या पावसात वनातून एकल प्रवास--शिक्षण यात्री

प्रगती जाधव-पाटील ।सातारा : एकीकडे फलटण तालुक्यातील उजाड माळरानातून थेट किर्रर्र झाडी असलेल्या भागातील डोंगरावरील शाळा... पावसाळ्यात डोक्यावर कोसळणारा पाऊस आणि पायाखालची लाल सटकणारी माती... त्यात घनदाट झाडीमुळे रोज जंगलात वाट चुकणं... समोर आलेल्या या परिस्थितीला आव्हान म्हणून त्यांनी स्वीकारलं आणि लढायचं ठरवलं. जिथून आपण रस्ता हमखास चुकतोय तिथं डोक्याचा स्कार्फ फाडून झाडांना बांधला आणि तयार केला स्वत:च स्वत:साठी दिशादर्शक फलक!पाटण तालुक्यातील पळ्याचा वाडा ही शाळा डोंगरावर आहे. डोंगराच्या पायथ्याला गाडी लावून सुमारे दीड किलोमीटरची चढाई केल्यानंतर गावाच्या शेवटच्या टोकावर ही शाळा येते. शाळेचा पटही जेमतेम आहे. वाट्याला आलेली शेती कसण्याचं काम येथील वयस्क आणि महिला करतात, तर तरणीपोरं मुंबईला नोकरीसाठी जातात. डोंगरावर जाण्याचा सराव येथील ग्रामस्थांना आहे. मात्र, ज्यांनी कायम उजाड माळरान बघितले अशा फलटण भागातील शिक्षिका हेमा भोईटे यांच्यासाठी ही शाळा आणि परिसर म्हणजे अगदी विरुद्ध टोकचं होतं. पण त्यांनी हे आव्हान स्वीकारण्याचं ठरवून या शाळेत हजर झाल्या. पहिले काही दिवस त्या शाळेकडे जाणारा रस्ता चुकायच्या आणि किर्रर्र झाडीत हरवून जायच्या. मोबाईलला रेंज नाही की जंगलात माणसं नाहीत. आठवडाभर हा खेळ झाल्यानंतर त्यांनी त्यांचा स्कार्फ फाडला आणि तो चुकणाºया वळणावरील झाडाला बांधला. त्यानंतर त्या रस्ता चुकल्या नाहीत. पहिल्या कोसळणाºया पावसात त्या आजारीही पडल्या; पण या सर्व परिस्थितीवर मात करून त्यांनी विद्यार्थी शिक्षणाचे काम केले. नियमीत आणि वेळेत शाळेत येणं आणि विद्यार्थ्यांना शिकविणं हा त्यांचा क्रम राहिला. त्याबरोबरच शाळेतील विद्यार्थ्यांना टापटीप राहण्यासाठीही विशेष प्रयत्न करावे लागले. त्यामुळेच आज तेथील विद्यार्थी शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच वागण्या बोलण्यातही तरबेज झाले.घनदाट झाडीत जंगली श्वापदांची भीतीपळ्याचा वाडा शाळेत पोहोचण्यासाठी शिक्षकांना रोज सुमारे दीड किलोमीटर घनदाट जंगलातून प्रवास करावा लागतो. या परिसरात जंगली श्वापदांचा वावर आहे. स्थानिकांना याची माहिती असल्याने ते सावधपणे या मार्गावरून प्रवास करतात; पण शिक्षिकांना एकटं हा प्रवास करणं धोक्याचं आहे. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या मंदिरात देवी दर्शनासाठी येणारे किंवा पर्यटक म्हणून येणारे लोक झाडीच्या आडोशाला मद्यपानही करतात. शाळा सुटल्यानंतर परतीच्या प्रवासात हे पर्यटक शिक्षिकांचा थरकाप उडवतात. त्यांच्या या सुरक्षिततेचा विचार कुठेच झाला नाही.पळ्याचा वाडा येथे पटसंख्या मर्यादित आहे. तरीही येथे शाळा सुरू आहे. शिक्षकही रोज डोंगर चढून येथे अध्यापनाचे काम करत आहेत. भविष्यात कमवणारा म्हणून मुलांच्या शिक्षणाकडे पालक लक्ष देतात; पण घरापासून शाळा दूर असली तर मुलींचं शिक्षण बंद हाच पर्याय पालकांना दिसतो. त्यामुळे त्रास सहन करून शिक्षक येथे येतात.- प्रदीप घाडगे, केंद्र प्रमुख, पाटणडोंगर चढणं अन् उतरणं दोन्ही जिकिरीचंपळ्याचा वाडा शाळेत जाण्यासाठी डोगर चढणं जेवढं जिकिरीचं आणि तेवढचं ते उतरणंही कसबीचं काम आहे. तीव्र चढ असल्यामुळे डोंगर चढताना धाप लागते. तर उतरताना लाल माती घसरडी असल्यामुळे पडण्याची भीती असते. पावसाळ्यात तर १५ आॅगस्टचा कार्यक्रम उरकून निघालेली ही शिक्षिका या रस्त्यावरून घसरून पडली. त्यामुळे त्यांना गंभीर दुखापतही झाली. सुमारे दोन महिने त्यांच्यावर उपचार सुरू होते.पाटण तालुक्यातील पळ्याचा वाडा या डोंगरी शाळेत जाण्यासाठी शिक्षिकेला घनदाट जंगलातून जावे लागते.

टॅग्स :Schoolशाळाzpजिल्हा परिषदTeacherशिक्षक