विठ्ठल नलवडे - कातरखटाव -येथील मातंग वस्ती गेल्या तीन महिन्यांपासून भीषण पाणी टंचाईला सामोरी जात आहे. वस्तीची अडचण लक्षात घेऊन येथील सावली फाउंडेशनने त्यांच्यासाठी मोफत पाण्याच्या टँकरची सोय केली आहे.कातरखटाव गावात अंतर्गत नळाद्वारे पाणीपुरवठा सुरळीत सुरू आहे. पाणीयोजनेची पाईपलाईन मातंगवस्तीला पहिल्यापासून जोडली गेली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी महिला ठिकठिकाणी पायपीट करत होत्या. पंधरा टक्के अनुदानातील मागासवर्गीयांना शासनाकडून मिळणारे डबे पाणीपट्टी भरल्याशिवाय पाणी दिले जाणार नाही, असे ग्रामपंचायतीने सांगितले होते. कातरखटावपासून अर्ध्या किलोमीटरवर असणाऱ्या मातंगवस्तीला आतापर्यंत स्थानिक बोअरचा आसरा होता. बोअरच्या पाण्याची पातळी खाली गेल्यामुळे मातंग वस्तीवरील महिला व ग्रामंस्थाची पिण्याच्या व वापराच्या पाण्यासाठी तीन महिने त्रेधातिरपीट सुरू आहे. कडक उन्हाळा संपत आल्यानंतर मे महिन्याअखेरीस ग्रामपंचायतीद्वारे शासनाने येरळा धरणातील न फिल्टर केलेला शेवाळलेल्या पाण्याचा टँकर पाठवला. हे पाणी घेण्यास मातंग वस्तीच्या महिला व ग्रामस्थांनी नकार दिला. शेवाळलेले, चिकट, अशुध्द पाणी आम्हाला नको आहे, असे येथील महिलांनी सांगितले.पाणीपट्टी समान लावणारे आणि पाणीपुरवठा करताना आस्था न दाखवणाऱ्या गावाने वर्षातून किती महिने मातंग वस्तीला पाणी पुरवले व पाणीपट्टी कोणा-कोणाची वसूल केली, असा सवाल पोपट मोरे यांनी उपस्थित केला आहे. मातंग वस्तीतील हा प्रकार समजल्यानंतर सावली फाउंडेशनने पुढाकार घेऊन खासगी बोअरचे पाणी सुरू केले. रोज नियमितपणे या वस्तीला विनामोबदला पाण्याचे वाटप केले जात आहे. काही दिवसांपूर्वी येरळा धरणातील शासकीय पाण्याचा टँकर आम्ही मातंग वस्तीला देण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी त्यांनी ‘आम्हाला गढूळ पाणी नको आहे. आमची पोरंबाळं आजारी पडतील, टँकर खाली करायचा नाही,’ असे सांगितले. महिला व मातंग वस्तीमधील ग्रांमस्थानी टँकर परत पाठविला. काही शासकीय अडचणीमुळे टँकर उशिरा मिळाला असला तरी वाड्या-वस्त्यानां सध्या टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. राजेंद्र बागल, सरपंच, कातरखटाव गेली चार महिने मातंग वस्तीमधील महिला व ग्रामस्थ पिण्याच्या व वापराच्या पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. अशा वेळी ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष का? या गंभीर परिस्थितीची जाण ठेवून गावातील खासगी मालक स्वत:च्या बोअरचे पाणी गेली दीड महिन्यापासून मातंग वस्तीला पुरवत आहेत. पाणी न देता गोरगंरीबांकडून पाणीपट्टी वसूल करण्यापुरती ग्रामपंचायत आहे का? मातंग वस्तीला दिलेली ही वागणूक लोकशाहीत अयोग्य आहे.पोपट मोरे, ग्रामस्थ, कातरखटाव व माजी सभापती
सावली फाउंडेशनने दिले मातंग वस्तीला स्वच्छ पाणी!
By admin | Published: June 03, 2015 10:44 PM