शहरं
Join us  
Trending Stories
1
Mahayuti: "रामटेकमध्ये जयस्वाल नकोच, महायुतीने दुसरा उमेदवार द्यावा"
2
IAS अधिकारी रानू साहू यांना अटक, 540 कोटींचा DMF घोटाळा काय?
3
आज माझं कुटुंब कोसळलं आहे, पण...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर मुलगा झिशान सिद्दिकींनी काय आवाहन केलं?
4
इस्रायलच्या हल्ल्यात हमास प्रमुख याह्या सिनवार ठार; 3 महिन्यांत 3 मोठे शत्रू संपवले
5
'जुन्या गोष्टी विसरुन भविष्याकडे वाटचाल करा', भारत-पाक संबंधांवर नवाझ शरीफ स्पष्ट बोलले
6
"वरोराची जागा भाजपलाच हवी, अन्यथा...", पक्षाला इशारा, इच्छुक धडकले कार्यालयात
7
सरकारनं खेळाडूंची बक्षिसं दिली नाहीत, विश्वविजेत्या संघातील काहींशी चर्चा झाली; आव्हाडांचा दावा
8
"तुमच्यात धमक असेल, तर..."; प्रवीण दरेकरांचं मनोज जरांगेंना खुलं आव्हान
9
'या खुर्चीने दगा दिला ऐसा की...'; शिंदेंच्या सेनेने ठाकरेंना व्यंगचित्रातून डिवचलं
10
IPL 2025: काव्या मारन खेळणार मोठा डाव; पॅट कमिन्स नव्हे, 'हा' स्टार क्रिकेटर खाणार जास्त 'भाव'
11
विधानसभेला भाजपचे प्रभाकर पाटील 'घड्याळ' हातात बांधणार?; महायुतीत हालचाली गतीमान; लवकरच शिक्कामोर्तब!
12
दोन महिन्यांपासून ठावठिकाणा नाही, शेख हसिना आहेत कुठे? समोर आली अशी माहिती
13
INDW vs NZW : टीम इंडियाची घोषणा! हरमनबद्दलच्या चर्चांना पूर्णविराम; रिचा १२वी बोर्ड परीक्षेमुळे मुकणार
14
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खासगी प्रवासी बसची टेम्पोला धडक; अपघातात २३ जण जखमी 
15
१८०० वर इच्छुकांसोबत आज केवळ चर्चा, निर्णय अंतिम बैठकीत समाज घेणार: मनोज जरांगे
16
पुन्हा रेल्वे अपघात, लोकमान्य टर्मिनल एक्स्प्रेसचे ८ डबे रुळावरून घसरले; आसाममध्ये रेल्वे सेवा विस्कळीत
17
माजी खासदार संभाजीराजेंचा मोठा गौप्यस्फोट; "लोकसभा निवडणुकीत काँग्रेस हायकमांडनं..."
18
VIDEO: इम्तियाज जलील यांची घोषणा; विधानसभेसह नांदेड लोकसभा पोटनिवडणूकही लढवणार
19
IND vs NZ : भारताची लाजिरवाणी कामगिरी; रोहितकडून मोठ्या चुकीची प्रामाणिक कबुली, म्हणाला...
20
'मिट्टी में मिला देंगे...', उत्तर प्रदेशातील 'योगी'राजमध्ये सात वर्षात 12 हजार एन्काउंटर

शाहूपुरीत पन्नास ठिकाणी गळती!

By admin | Published: March 13, 2017 5:12 PM

दुष्काळात तेरावा : अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे लाखो लिटर पाणी रस्त्यावरून गटारीत

शाहूपुरीत पन्नास ठिकाणी गळती!दुष्काळात तेरावा : अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे लाखो लिटर पाणी रस्त्यावरून गटारीतशाहूपुरी (सातारा) : जिल्ह्यातील बहुतांश भागात दुष्काळांच्या चटक्यांची दाहकता जाणवत असतानाच शाहूपुरीमध्ये लाखो लिटर पाणी गटारीतून वाहून जात आहे. येथील दत्त दिगंबर कॉलनी, पवार कॉलनी, समता पार्क, शिवाजीनगर, जवाहर कॉलनी परिसरातील जलवाहिनीला सुमारे पन्नास ठिकाणी गळती लागली आहे. याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.जिल्ह्यात सणासुदीच्या काळात अनेक गावांमधील लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. साताऱ्याच्या उपनगरांमध्येही काही दिवसांतच ही वेळ येणार आहे. या अवस्थेतही शाहूपुरीत विचित्र परिस्थिती पाहायला मिळत आहे. शाहूपुरीला पाणीपुरवठा करत असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या जलवाहिनीला गेल्या काही महिन्यांपासून ठिकठिकाणी गळती लागली आहे. त्यातून दररोज लाखो लिटरचे पाणी वाया जात आहे. गळती लागल्यामुळे या परिसरातील रस्त्यावर ठिकठिकाणी चिखल साठत आहे. तेथून जाताना ज्येष्ठ नागरिक, तरुणींचे पाय घसरत असल्याने तेथून चालणेही अवघड बनत आहे. गेल्या काही महिन्यांपासून हीच अवस्था असताना त्याकडे प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.गळती लागल्यामुळे वाहनचालक व विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात आहे. संबंधित विभागाने वेळेतच लक्ष लागून येथील सर्व गळती लागलेल्या जलवाहिनीची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. पाणी बचतीचे महत्त्व प्राधिकरणाला कधी कळणार, असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे.दुरुस्तीचे कर्मचारी अवेळीजीवन प्राधिकरणने या परिसरात जलवाहिनीच्या दुुरुस्तीसाठी कर्मचारी नेमले आहेत. परंतु ते कधीही वेळेवर उपलब्ध नसतात. जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम कसेबसे घाई गडबडीत तात्पुरते करून तेथून पळ काढतात. त्यामुळे परत त्या जागेवर गळती लागते. गळती रोखणे हे संबंधित यंत्रणांचे कर्तव्यच ठरते. प्राधिकरणने मनमानी कारभारास वेळीच आवर न घातल्यास ग्रामस्थांच्या संतापाला सामोरे जावे लागेल. शाहूपुरीत अनेक वर्षे पाणीपुरवठा गळतीचा प्रलंबित असणारा प्रश्न सोडविण्यासाठी नियोजन नसल्याने येथील नागरिकांना या समस्येला सामोरे जावे लागत आहे. - भारत भोसले