सातारा : राज्यसभा शपथविधी प्रसंगी सभापती व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजेंचा अवमान करून शिवाजी महाराजांविषयीचा द्वेष दाखवून दिला आहे, असा आरोप करत शिवसेनेतर्फे गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नायडू यांचा निषेध करण्यात आला.छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि छत्रपती घराण्याचे वारसदार खासदार उदयनराजे भोसले यांनी शपथ घेताना जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी ही घोषणा दिल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांनी ''हे तुमचे घर नव्हे...माझे दालन आहे, इथे अशा घोषणा चालणार नाहीत, अशा पद्धतीने छत्रपतींचा अपमान केलेला आहे.भाजपची भूमिका नेहमी महाराष्ट्र द्वेष्टी राहिलेली आहे, हे परत एकदा या माध्यमातून दिसून आलेले आहे. परंतु महाराष्ट्राची भूमी आणि शिवसेना छत्रपतींचा अपमान कधीही सहन करणार नाही, असे आंदोलकांनी स्पष्ट केले.शिवसेना सातारा जिल्ह्याच्यावतीने जिल्हा प्रमुख यशवंत घाडगे, चंद्रकांत जाधव, जयवंत शेलार यांच्या नेतृत्वाखाली व्यंकय्या नायडू व भारतीय जनता पार्टी यांचा जाहीर निषेध करण्यात आला. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते, शहर प्रमुख बाळासाहेब शिंदे आदी उपस्थित होते.
उदयनराजेंचा अवमान, शिवसेनेकडून व्यंकय्या नायडू यांचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 12:12 PM
राज्यसभा शपथविधी प्रसंगी सभापती व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजेंचा अवमान करून शिवाजी महाराजांविषयीचा द्वेष दाखवून दिला आहे, असा आरोप करत शिवसेनेतर्फे गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नायडू यांचा निषेध करण्यात आला.
ठळक मुद्देशिवसेनेकडून व्यंकय्या नायडू यांचा निषेधशिवसेना छत्रपतींचा अपमान कधीही सहन करणार नाही