शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 ...अन् विक्रमी विजयासह 'सूर्योदय' झाला! पंजाबवर ट्रॅविस हेड-अभिषेक जोडी पडली भारी!
2
रायगडावर एकनाथ शिंदेंनी भाषण केले, पण तुमचे नाही झाले, डावलले गेले का? अजित पवार म्हणाले...
3
Abhishek Sharma Record : वादळी शतकी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला KL राहुलचा विक्रम
4
"धिस वन इज फॉर ऑरेंज आर्मी"... नो बॉलवर फ्री हिट मिळते; अभिषेक शर्माला सेंच्युरी मिळाली!
5
तहव्वूर राणाने वकिलाबाबत ठेवली एक मोठी अट; न्यायालयानेही केली मान्य, न्यायाधीश म्हणाले...
6
प्रियांश-प्रभसिमरनसह अय्यरची फटकेबाजी! स्टॉयनिसनं ३०० प्लस स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा
7
इम्पॅक्ट टाकण्यासाठी अय्यरनं यशवर डाव खेळला! अभिषेक शर्मा फसलाही, पण नो बॉल पडला अन्...
8
सिंहगडावर आलेल्या परदेशी पर्यटकाला शिवीगाळ करायला लावली; तरुणांच्या टोळक्याच संतापजनक कृत्य
9
एकाच दुचाकीवर चौघांची सवारी, यात्रेहून परतताना भिंतीला धडकली; दोघांचा जागीच मृत्यू
10
आजचा दिवस डाऊनचा! युपीआयनंतर आता व्हॉट्सअप पण बराच वेळ बंद; ग्रुपवर मेसेज जाईनात
11
“जगातील अनेक प्रगत देशात EVMवर निवडणुका होत नाहीत, लोकशाही टिकवायची असेल तर...”
12
Ishan Kishan Viral Video : इशान किशनने अडवलेला चेंडू हरवला; कॅप्टन पॅट कमिन्सला तो सापडला!
13
१५ एप्रिलपासून तत्काळ तिकीट बुकिंगची वेळ बदलणार? रेल्वेने दिली महत्वाची माहिती... 
14
आमदार संदीप क्षीरसागरांची नगरपरिषदेतील लेखापालास धमकी; पोलिसात तक्रार दाखल
15
वक्फ कायद्यावरून बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार, ३ जणांचा मृत्यू; जमावाकडून वडील आणि मुलाची निर्घृण हत्या
16
LSG vs GT : विक्रमी भागीदारी शुबमनच्या संघासाठी ठरली अशुभ! मार्करम-पूरनच्या जोरावर पंतचा रुबाब
17
अमित शाह यांच्याशी काय चर्चा झाली? पालकमंत्रीपदाबाबत काही ठरले का? सुनील तटकरे म्हणाले...
18
“पुस्तकावर बंदीची मागणी करायला हवी होती, उदयनराजे ‘बंच ऑफ थॉट’ वर गप्प का?”; काँग्रेसचा सवाल
19
मला वाटते ५ वेळच्या नमाजपेक्षा...; फराह खानने प्रश्न विचारणाऱ्या चाहतीला दिले असे उत्तर...
20
विधानसभेला माघार घेतली, आता ठाकरेंनी सुधीर साळवींवर सोपवली मोठी जबाबदारी

उद्धवसेनेकडून पाटणमधून हर्षद कदम यांना उमेदवारी जाहीर; महाआघाडीत बंडखोरीची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 13:56 IST

सातारा : महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा पूर्णपणे सुटला नसतानाच उद्धवसेनेने पहिली यादी जाहीर करत पाटणमधून हर्षद कदम यांच्या ...

सातारा : महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा पूर्णपणे सुटला नसतानाच उद्धवसेनेने पहिली यादी जाहीर करत पाटणमधून हर्षद कदम यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. यामुळे पाटणमध्ये आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. कारण, राष्ट्रवादी अर्थात पाटणकर गट निवडणूक लढविण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे.विधानसभेची निवडणूक जाहीर होऊन आठ दिवस झाले आहेत. तरीही महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा पूर्णपणे सुटलेला नाही. दररोजच नवनवीन माहिती समोर येत आहे. त्यामुळे कोणते मतदारसंघ कोणत्या पक्षाच्या वाट्याला गेले आहेत हे पूर्णपणे स्पष्ट नाही. वरिष्ठ स्तरावर जागा वाटपावरून चर्चा सुरूच आहे. अशातच उद्धवसेनेने बुधवारी सायंकाळी आपली पहिली ६५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील पाटण मतदारसंघासाठी हर्षद कदम यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. पण, मुळातच पूर्वीच्या आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढवत आलेला आहे. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची अर्थात पाटणकर गटाची ताकद मोठी आहे. त्यातच येथे पक्षापेक्षा गटातच निवडणूक होते. अशातच उद्धवसेनेने उमेदवार जाहीर केल्याने पाटणकर गट शांत बसेल, अशी चिन्हे नाहीत. त्यामुळे आघाडीत बंडखोरी होऊ शकते. तसेच सत्यजितसिंह पाटणकर हे अपक्ष लढू शकतात. त्यामुळे पाटणमध्ये तिरंगी लढत होण्याची अधिक शक्यता आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादीचीही यादी येणार..आघाडीत उद्धवसेनेने पहिल्यांदा यादी जाहीर केली. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीची यादी जाहीर होईल. पण, सातारा जिल्ह्यात आठ मतदारसंघ आहेत. त्यातील कोणाच्या वाट्याला किती गेलेत हेच स्पष्ट नाही. त्यातच उद्धवसेना दोन मतदारसंघासाठी आग्रही आहे. काँग्रेसलाही दोन मतदारसंघ हवेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला फक्त चार मतदारसंघच राहतात. त्यामुळे जागा वाटपाचा तिढा सुटल्यानंतरच कोणाकडे किती मतदारसंघ राहणार, हे स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४patan-acपाटणUddhav Thackerayउद्धव ठाकरे