शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

दक्षिण आफ्रिकेत कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये ९ सातारकरांचा झेंडा, भारतातून ३३६ स्पर्धकांचा सहभाग 

By प्रगती पाटील | Published: June 11, 2024 7:11 PM

पूर्णपणे डोगरदर्‍यातून होणारी ही मॅरेथाॅन अतिशय खडतर

सातारा : दक्षिण आफ्रिका येथे झालेल्या कॉम्रेड मॅरेथॉन मध्ये साताऱ्याच्या शिव स्पिरीट टीमने उत्तुंग यश मिळवले. ८७ किलोमीटरची ही मॅरेथॉन डर्बन या शहरात चालू होऊन पीटरमॅटीजबर्ग या शहरामध्ये संपते. जगभरातून २४ हजार स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी होतात. भारतभरातून ३३६ स्पर्धकांपैकी साताऱ्यातून शिव स्पिरिट टीमच्या ३६ स्पर्धकांनी भाग घेतला होता. पूर्णपणे डोगरदर्‍यातून होणारी ही मॅरेथाॅन अतिशय खडतर मानली जाते.सातारा मधून नऊ जणांनी शिव यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ही मॅरेथॉन यशस्वीरित्या पूर्ण केली. पहाटेच्या थंडीमध्ये ही मॅरेथॉन चालू होते आणि पाच मोठे डोंगर आणि २५ हून अधिक लहान डोंगर पार करत ही मॅरेथॉन ८७ किलोमीटर संपते. जगातील अतिशय खडतर समजल्या जाणाऱ्या मॅरेथॉनमध्ये ही मॅरेथॉन गणली जाते. यावर्षी कॉम्रेड मॅरेथॉनचे हे ९७ वर्षे होते. गेले सहा महिने अतिशय खडतर परिश्रम सातारा मधील शिवस्पिरिटच्या टीमने घेतले.पहाटे एक वाजता कधी बारा वाजता हे ट्रेनिंग चालू व्हायचे झोपेची आणि जीवाची परवा न करता या सर्व शिवस्पिरिट टीमने अतिशय मेहनत केली. शिवस्पिरिट टीमचे सर्वेसर्वा शिव यादव यांनी नियोजनबद्ध मार्गदर्शन केले. तसेच दिव्यानी निकम यांनी अतिशय पद्धतशीरपणे आहाराचे मार्गदर्शन केले. सर्व धावपटूंचे विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून काैतुक होत आहे. हे आहेत रनरसाताऱ्यातून या स्पर्धेसाठी डॉ. सुधीर पवार, डॉ. मयूर फरांदे, यश मुचांडी, अजित निकम, विजय भिलारे, राजेंद्र रासकर, अनिरुद्ध पोतेकर, उदय घोरपडे, अल्मास मुलाणि यांनी ही खडतर स्पर्धा पूर्ण केली. डॉ. सुधीर पवार यांनी ही स्पर्धा दुसऱ्यांदा पूर्ण केली. सर्व शिव स्पिरीट टीम चे विविध स्तरातून कौतुक केले जात आहे. कास अल्ट्रा ही स्पर्धा या टीमने सातारा येथे खास कॉमरेडस मॅरेथॉनच्या सरावासाठी आयोजित केली होती. देशभरातून ५०० स्पर्धक साताऱ्यात येऊन या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.

धावपटूंसाठी सातारा हे सर्वोत्तम ठिकाण आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षीही साताऱ्यातून काॅम्रेड मॅरेथाॅनमध्ये सहभागी होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सहभाग वाढण्याबरोबरच ही स्पर्धा यशस्वी करणाऱ्यांची संख्याही मोठी असल्याने रनर हब अशीही साताऱ्याला नवी ओळख मिळत आहे. - शिव यादव, फिटनेस ट्रेनर

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMarathonमॅरेथॉन