शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

सातारा : साखळी येथील शिवपुतळा पुन्हा सन्मानाने बसवा : शिवेंद्रसिंहराजे भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 12:26 PM

सातारा : छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे भारत देशाचे आराध्यदैवत. महाराष्ट्राची आणि प्रत्येक मराठी मनाची अस्मिता असलेल्या शिवछत्रपतींचा पुतळा गोवा राज्यातील साखळी या नगरपालिकेकडून हटवण्यात आला. ही खेद आणि चिंतेची बाब आहे. गोवा सरकारने साखळी येथील शिवाजी महाराजांचा पुतळा त्याच ठिकाणी सन्मानाने स्थानापन्न करावा, अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली.

ठळक मुद्देसाखळी येथील शिवपुतळा पुन्हा सन्मानाने बसवा : शिवेंद्रसिंहराजे भोसलेछत्रपतींचा पुतळा हटविण्यामागचा हेतू तरी काय?

सातारा : छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे भारत देशाचे आराध्यदैवत. महाराष्ट्राची आणि प्रत्येक मराठी मनाची अस्मिता असलेल्या शिवछत्रपतींचा पुतळा गोवा राज्यातील साखळी या नगरपालिकेकडून हटवण्यात आला. ही खेद आणि चिंतेची बाब आहे. गोवा सरकारने साखळी येथील शिवाजी महाराजांचा पुतळा त्याच ठिकाणी सन्मानाने स्थानापन्न करावा, अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली.साखळी ता. सत्तारी, जि. उत्तर गोवा येथील भर चौकातील शिवाजी महाराजांचा पुतळा साखळी नगरपालिकेने बेकायदेशीर ठरवून हटवला. या कृत्याबद्दल निषेध करताना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकात म्हटले आहे की, संपूर्ण देशभरात असंख्य पुतळे आहेत. मात्र, त्यापैकी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळेच कसे बेकायदेशीर वाटतात. शिवपुतळा हटवण्यामागे नेकमा काय हेतू आहे, हेच समजत नाही.

न भुतो, न भविष्यती असे आदर्शदायी व्यक्तिमत्व असलेल्या छत्रपती शिवरायांचा इतिहास केवळ भारतीयांनाच नव्हे तर जगभरातील सर्वांनाच प्रेरणादायी आहे. शिवछत्रपती म्हणजे तमाम मराठी जनांची अस्मिता आणि प्रतिष्ठा आहे. असे असताना भर चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गोवा राज्यातील एका नगरपालिकेने हटवावा, ही अत्यंत खेदजनक आणि दुर्दैवी बाब आहे.साखळी नगरपालिकेकडून अक्षम्य अशी चूक झाली आहे. यामुळे शिवछत्रपतींचा घोर अवमान झालेला आहे. गोवा सरकारने ही बाब गांभीर्याने घेऊन तातडीने साखळी येथील चौकात पुतळा होता त्याच ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा सन्मानाने पूर्ववत बसवावा, अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

टॅग्स :Shivendrasinghraja Bhosaleशिवेंंद्रसिंहराजे भोसलेSatara areaसातारा परिसरShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज