महाबळेश्वर : स्वराज्यावर चालून आलेल्या अफझलखानाचा छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी वध केला. याच किल्ल्यावर तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ३० नोव्हेंबर १९५७ रोजी किल्ले प्रतापगड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण केले. त्या पुतळ्याला ६२ वर्षे पूर्ण होत आहे.महाबळेश्वरच्या जटांत व पारघाटाच्या ओठात शिवाजी महाराजांनी बुलंद किल्ला बांधला. तो म्हणजे प्रतापगड. हा किल्ला आजही सुस्थितीत उभा असून, किल्ल्यावर ३० नोव्हेंबर १९५७ रोजी भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी किल्ले प्रतापगड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या देखण्या पुतळ्याची कहाणी तितकीच रोमहर्षक आहे. प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा असणारा राजवाडा ब्रिटिशांनी १८१८ ला उद्ध्वस्त केला. शिल्पकार रामचंद्र पांडुरंग कामथ यांनी प्रतापगडावर बसविण्यात आलेला पुतळा विलेपार्ले येथे बनविला.
हा पुतळा पंचधातूंचा बनविण्यात आला आहे. या पुतळ्याचे वजन ४ हजार ५०० किलो म्हणजे ४.५ टन आहे; परंतु हा पुतळा आतून भरीव नसून पोकळ आहे. हा पुतळा एवढा जड असल्यामुळे भाग सुटे करून एकूण सतरा भाग गडावर आणण्यात आले. याला तेथे वेल्डिंगच्या साह्याने जोडण्यात आला, त्यानंतर लाकडी क्रेन करून चौथऱ्यावर ठेवण्यात आला.
यामध्ये घोडीचा एक पाय हवेत असलेला दिसतो, याचा अर्थ असा होतो की, घोडीवर बसलेल्या राजाचा मृत्यू नैसर्गिक आजारपणामुळे झाला आहे. तर काही घोड्याचे पुढचे दोन्ही पाय हवेत असतात. त्यावर बसलेला राजा लढाईत मारला गेलेला असतो. चारही पाय घोड्याचे जमिनीवर असल्यास तो राजा समोरच्या राजाला शरण गेलेला असतो. किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला ३० नोव्हेंबरला ६२ वर्षे पूर्ण झाले आहेत.पुतळा अनावरण कार्यक्रमामध्ये पंतप्रधान पंडित नेहरू पुतळ्याच्या मागील बाजूला गेले होते. तेथे काही क्षण बसले होते. तेथे नेहरू पॉर्इंट असे नाव देण्यात आले होते.पुतळ्याची उंची ३६ फूटघोड्याच्या पायापासून ते तलवारीच्या टोकापर्यंत एकूण १६ फूट उंच आहे. चौथºयापासून ३६ फूट आहे. चौथरा २० फुटांचा आहे. १९ फेब्रुवारी १६३० ते ०३ एप्रिल १६८० असे छत्रपती शिवाजी महाराज वयाचे पन्नास वर्षे जगले. यामध्ये महाराजांनी वयाच्या पंधराव्या वर्षी पुण्यामधील तोरणा किल्ला जिंकला. पंधरा वर्षांपासून पन्नास वयापर्यंत राज्य केले. ३६५ किल्ल्यांपैकी ३६ किल्ले महाराजांनी बांधले. ३६ वर्षांत ३६ किल्ले बांधले म्हणून पुतळ्याची उंची ३६ फूट ठेवण्यात आली.ब्रिटिशांकडून दोन पत्रप्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्यासंदर्भात ब्रिटिशांच्या ग्रंथालयामध्ये दोन पत्र मिळाली आहेत. यामध्ये पहिल्या पत्रात ह्यछत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य आणि कर्तृत्व मोठं आहे, याची तुलना अलेक्झांडर यांच्याशीही होत नाही,ह्ण असा उल्लेख आहे. दुसरे पत्र शिवाजी महाराजांनी मोघल अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, ह्यमाझ्या मायभूमीचं रक्षण करणं, माझं कर्तव्य होय, या भूमीवर आक्रमण करू पाहणारा मग तो कोणीही असो, तो कधीच यशस्वी झाला नाही,ह्ण असा उल्लेख केला आहे. या दोन्ही पत्रांच्या प्रती पुतळा परिसरात लावण्यात आल्या आहेत.