किडगाव : किडगाव पंचायत समिती गणात बहुतांश गावात सत्ता अबाधित ठेवण्यात सत्ताधाऱ्यांना यश आले आहे. गावातील केलेली विकासकामे आणि मतदारांपर्यंत विकासकामांची यादी पोहोचवल्यामुळेच अनेक गावांत सत्ताधाऱ्यांना सत्तेपासून विरोधक दूर करू शकले नाहीत. किडगाव परिसरात किडगाव, नेले, कळंबे, सारखळ या गावांनी आपली सत्ता सत्ताधाऱ्यांनी आपल्याकडेच ठेवण्यात यश मिळवले आहे, तर हमदाबाज गावात बदल झालेला आहे. किडगावमध्ये भैरवनाथ विकास पॅनलने विरोधी गणेश विकास परिवर्तन पॅनलचा पराभव करून पंधरा वर्षांची आपली सत्ता गावात अबाधित ठेवली आहे.
किसनवीर साखर कारखान्याचे संचालक चंद्रकांत इंगवले व इंद्रजित ढेंबरे यांच्या नेतृत्वाखाली भैरवनाथ ग्रामविकास पॅनल नऊच्या नऊ जागा जिंकून परत एकदा वर्चस्व सिद्ध केले आहे. विरोधी गणेश विकास परिवर्तन पॅनलचे नेतृत्व दत्तात्रय इंगवले, अजिंक्यतारा सूतगिरणीचे संचालक सुरेश टिळेकर व बाळासाहेब इंगवले यांच्याकडे होते.
किडगावमधील विजयी उमेदवार राजहंस घोलप, अधिका टिळेकर, सविता इंगवले, संतोष इंगवले, संतोष टिळेकर, शुभांगी चोरगे, इंद्रजित ढेंबरे, शुभांगी इंगवले, सोनाली पवार, नेले गावात अजिंक्य ग्रामविकास पॅनलला पाच जागा, तर शेतकरी पॅनल चार जागा जिंकून समाधान मानावे लागले. विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे इंद्रजित जाधव, सत्वशीला जाधव, संगीता जाधव, युवराज जाधव, रूपाली कांबळे, चंद्रकांत टिळेकर, विठ्ठल जाधव, जुबेदा भालदार आणि इंदू जाधव.
कळंबे येथील ग्रामपंचायत अत्यंत चुरशीची झाली होती. सातारा पंचायत समितीच्या सभापती सरिताताई इंदलकर, सूर्यकांत इंदलकर, अमित इंदलकर आणि संभाजी इंदलकर यांच्या नेतृत्वाखाली कळंबे विकास पॅनल सर्वच्या सर्व नऊ जागा जिंकून ग्रामपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व मिळविले. सत्ताधारी विरोधी पॅनलचे नेतृत्व कुंडलिक इंदलकर करीत होते. कळंबे येथील विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे : प्रकाश चिंचकर, संतोष इंदलकर, संतोष इंदलकर, वर्षा लवंघरे, विजय इंदलकर, सरिता जायकर, अलका इंदलकर, प्रवीण मस्के, शोभा इंदलकर, वैशाली इंदलकर.
सारखळ ग्रामपंचायत निवडणुकीत वाघजाई पॅनल ५, तर मोरेश्वर परिवर्तन पॅनलला दोन जागांवर समाधान मानावे लागले.
किडगाव पंचायत समिती गणात व लिंब जिल्हा परिषद गटात आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे वर्चस्व आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत या सर्व ग्रामपंचायतींत शिवेंद्रराजे गटाचे वर्चस्व असल्याचे सिद्ध झाले आहे.
चौकट
मिरवणूक, गुलालावर बंदी...
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार निवडणुकीनंतर मिरवणुका, गुलालबंदी व डीजे बंदी आदेश जाहीर झाल्याने या परिसरात कोणत्याही गावात मिरवणूक अथवा गुलालाचा वापर केला गेला नाही.