शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

राजधानीत शिवरायांचे वस्तुसंग्रहालय रखडल

By admin | Published: February 27, 2015 9:16 PM

दुर्लक्षाचे दुखणे : बांधकाम-पुरातत्व विभाग दाखवतायेत एकमेकांकडे बोटे

सातारा : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक वस्तूंना सातारा या त्यांच्या अखेरच्या राजधानीत जागा मिळेना झालीय! या ऐतिहासिक वस्तूंसाठी हजेरी माळावर गेल्या सहा वर्षांपासून वस्तुसंग्रहालयाचे काम रखडत-रखडत सुरू आहे. शासनाचे पुरातत्व व बांधकाम या दोन खात्यांमधील समन्वयाचा अभाव असल्यानेच हे काम रखडले आहे, असा आरोप शिवप्रेमींकडून केला जात आहे.सातारा शहर हे हिंदवी स्वराज्याची अखेरची राजधानी आहे. या शहरात शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक वस्तूंसाठी सुसज्ज असे संग्रहालय नव्हते. मार्केटयार्डमध्ये असणाऱ्या एका इमारतीमध्ये हे संग्रहालय सुरू आहे. शहरात सुसज्ज वस्तुसंग्रहालय व्हावे, या हेतूने तब्बल सहा वर्षांपूर्वी हजेरी माळावर वस्तुसंग्रहालय तयार करण्याचे काम सुरू झाले. यासाठी शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून आठ कोटी रुपये मंजूर झाले.सुरुवातीच्या काळात निधी मिळाला. त्यानुसार हे काम वेगाने झाले; परंतु काही दिवसांतच हे काम रखडले. पुरातत्व-बांधकाम या दोन विभागांच्या समन्वयाअभावी हे काम अनेक दिवस रखडले होते. पुरातत्व विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आडमुठ्या धोरणामुळे कामात अडथळे येत असल्याचा आरोप शिवप्रेमींनी सुरू केला होता. साताऱ्यातील सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र वाडकर यांनीही उपोषण केले होते. त्यानंतर निधी मिळाला, काही प्रमाणात काम झाले. आता पुन्हा काम रखडले आहे. पालकमंत्री विजय शिवतारे व खासदार उदयनराजे भोसले यांनी या कामाची प्रजासत्ताकदिनी पाहणी केली तेव्हा संग्रहालयाचे काम करताना ऐतिहासिक बाज कायम राहणे आवश्यक असल्याची सूचना त्यांनी केली होती. त्यानंतरही कामाला गती आलेली नाही. पुरातत्व विभाग बांधकाम विभागाकडे आणि बांधकाम विभाग पुरातत्व विभागाकडे बोटे दाखविण्याव्यतिरिक्त कुठली हालचाल होताना दिसत नसल्याचे दुर्भाग्य आहे. (प्रतिनिधी)बांधकाम विभागाकडे जे काम होते ते ९० टक्के पूर्ण झाले आहे. आता उर्वरित काम पुरातत्व विभागाच्या माध्यमातून पूर्ण करायचे आहे. काँक्रिट, प्लास्टर, फरशा बसविण्याचे काम आम्ही पूर्ण केले. आता संग्रहालयाला ऐतिहासिक बाज आणण्यासाठी पुरातत्व खात्यामार्फत काम होणे आवश्यक आहे; पुरातत्वच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी भेटूनही लवकर निर्णय देत नाहीत.- मनोज ढोगचौळे, उपअभियंता, सार्वजनिक बांधकामबांधकाम विभागाने काम पूर्ण करून वस्तुसंग्रहालय पुरातत्व खात्याकडे वर्ग करणे आवश्यक होते; परंतु अद्यापही त्यांनी कामे अर्धवट ठेवली आहे. संग्रहालयात पाण्याची टाकी आवश्यक आहे. पण, तीही अद्याप बसविण्यात आलेली नाही. जून महिन्यापासून ही किरकोळ कामेही झालेली नाहीत. अंतर्गत कामे पुरातत्वमार्फत करता येतील. वेळ लागला तरी काम चांगले होण्याकडे आमचे लक्ष आहे.- एस. डी. मुळे, सहायक अभिरक्षक, पुरातत्व विभाग..ती सहा वर्षेतब्बल सहा वर्षांपूर्वी साताऱ्यातील छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालयाच्या कामासाठी आठ कोटी रुपये मंजूर झाले होते. सुरुवातीच्या काळात हे काम वेगाने झाले. पण, पुरातत्व विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या कामात पाचर ठोकल्याचा आरोप सामाजिक संघटनांकडून झाला. प्रसारमाध्यमांनीही वेळोवेळी आवाज उठविला होता. यानंतर रखडलेला निधी मिळाला होता.