शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
2
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
3
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
4
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
5
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
6
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
7
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
8
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
9
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
10
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
11
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
12
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
13
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
14
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
15
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
16
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
17
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
18
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
19
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
20
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी

भाजपच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन..

By admin | Published: May 11, 2017 11:03 PM

भाजपच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन..

लोकमत न्यूज नेटवर्ककऱ्हाड : ‘भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलेले वक्तव्य म्हणजे विनाशकाले विपरित बुद्धी आहे. बेताल वक्तव्य करून त्यांनी शेतकऱ्यांची चेष्टा चालवली आहे. या विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरेल. बळीराजाची चालवलेली मस्करी कदापिही खपवून घेणार नाही. त्यामुळे रावसाहेब दानवेंनी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा,’ अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांनी केली आहे.भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना कऱ्हाड येथे दत्त चौकात गुरुवारी शिवसेना जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निषेध आंदोलन केले. यावेळी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाप्रमुख रामभाऊ रैनाक, तालुकाप्रमुख विनायक भोसले, शहरप्रमुख शशिराज करपे, किरण नलवडे, मयूर देशपांडे, महेश पाटील व शिवसैनिक उपस्थित होते.हर्षद कदम म्हणाले, ‘एकीकडे शेतकरी चहूबाजूंनी संकटात आहे. त्याला बाहेर काढण्यासाठी तत्काळ उपाययोजना राबविण्याची गरज असताना जबाबदार व्यक्तींकडून अशी वक्तव्य केली जात आहेत. जालन्यातील कार्यकर्ता मेळाव्यात राज्य सरकारने एवढी तूर खरेदी केली तरीही रडगाणं चालूच आहे, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले होते. त्यांच्या या वक्तव्याने शेतकरी वर्गातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.कऱ्हाड येथे गुरुवारी दत्त चौकात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने दानवेंच्या प्रतीकात्मक पुतळ्याला चपलांचा हार घालून तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त करण्यात आला.’ भाजपविरोधात जिल्ह्यातील पहिले आंदोलनसातारा जिल्ह्यामध्ये शिवसेनेची आक्रमकता आघाडी सरकारच्या काळामध्ये अनेक आंदोलनातून पाहायला मिळाली आहे. मात्र, सध्या राज्यात आणि केंद्रात सत्तेत असणाऱ्या भाजपचा शिवसेना हा मित्रपक्ष म्हणून ओळखला जातो. अशा परिस्थितीत शिवसेनेने सातारा जिल्ह्यात भाजपच्या विरोधात केलेले हे पहिलेच आंदोलन म्हणून याचा विशेष उल्लेख करावा लागेल. भविष्यात जिल्ह्याच्या राजकारणात भाजप सेनेमध्ये तणाव निर्माण झाल्याचे पाहायला मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको. रखरखत्या उन्हात घोषणारखरखत्या उन्हात शिवसैनिक एकत्र आले. ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणा देत त्यांनी परिसर दुमदुमून सोडला आणि दानवेंच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केल्याने वातावरण अधिकच तापले.