सातारा : पुणे-बेंगलोर महामार्गावर भरतगाव वाडी हद्दीत सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास कोल्हापूरच्या दिशेने जाणारी शिवशाही बस पलटी झाली. यात १५ प्रवासी जखमी झाले आहेत. बसचालकाचा बसवरील ताबा सुटल्याने ही दुर्घटना घडली. दरम्यान, गेल्या काही दिवसांत शिवशाही बसच्या अपघातांमध्ये वाढ होताना दिसत आहे.
पुण्याहून चिपळूणच्या दिशेने शिवशाही बस (एम.एच०९ इ.एम,१९४) निघाली होती. पुणे-बेंगलोर आशियाई महामार्गावर सातारा तालुक्यातील भरतगाव वाडी हद्दीत चालकाचा बसवरील ताबा सुटला. त्यामुळे बस दुभाजकाला धडकून पलटी झाली. यात 15 प्रवासी जखमी झाले आहेत. परिसरातील नागरिकांनी मदतीला धावून येत जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच बोरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातानंतर स्थानिकांनीही जखमींना मदत केली.