शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
2
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
3
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
5
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
6
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
7
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
8
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
9
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
10
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
12
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
13
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
14
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
15
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
16
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
18
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
19
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
20
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट

Satara Crime News: भाजपच्या माजी आमदाराच्या बंगल्यात सापडला मृतदेह, उघडकीस आली धक्कादायक माहिती; एकावर गुन्हा दाखल

By दत्ता यादव | Published: January 05, 2023 5:39 PM

बंगल्याच्या कंपाऊंडमध्ये एका महिलेचा मृतदेह पुरण्यात आला होता.

सातारा : भाजपाच्या माजी आमदार कांताताई नलावडे यांच्या बंद असलेल्या बंगल्याच्या परिसरात मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली होती. याबाबत धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. या महिलेचा खून करून मृतदेह पुरण्यात आला असल्याची धक्कादायक माहिती आठवडाभरानंतर उघडकीस आली. याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात एकावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. मंगल शिवाजी शिंदे (वय ५०, रा. संगम माहुली, ता. सातारा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंगल शिंदे या गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होत्या. याबाबत सातारा तालुका पोलिस ठाण्यात नोंद झाली होती. पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके हे या प्रकरणाचा तपास करत असताना त्यांना धक्कादायक माहिती मिळाली. मंगल शिंदे यांचा खून करून त्यांचा मृतदेह माजी आमदार कांता नलवडे यांच्या बंगल्याच्या पाठीमागील आवारात वाॅल कंपाऊंडच्या आतमध्ये पुरला असल्याचे समजले. त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पुरलेला मृतदेह खड्ड्यातून बाहेर काढण्यात आला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपीने मंगल शिंदे यांचा मृतदेह पुरला असल्याचे तपासात समोर आले. हा खून कोणी केला, याची पोलिसांनी माहिती घेतल्यानंतर आरोपीही निष्पन्न झाला. त्याने हा खून मंगल शिंदे यांच्या अंगावरील दागिन्यांसाठी केला असल्याचे समोर आले.

शिंदे यांच्या गळ्यातील बोरमाळ आणि सोन्याचे डोरले आरोपीने काढून घेतले. यानंतर खोरे डोक्यात मारून त्यांचा खून केला. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी पथके रवाना केली आहेत. आरोपीला पकडल्यानंतरच यातील आणखी वस्तुस्थिती समोर येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीMLAआमदारBJPभाजपाPoliceपोलिस