शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ सलून दुकाने बंद, सातारा, फलटणमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 12:06 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दौंड येथील भीमाशंकर साखर कारखाना गळित हंगामाच्या उद्घाटनप्रसंगी केलेल्या विधानामुळे नाभिक समाजबांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. या विधानाच्या निषेधार्थ जिल्ह्यातील नाभिक समाज बांधवांनी सलून दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. याला सातारा, फलटणमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ​​​​​​​

ठळक मुद्देगैरसोय होऊ नये म्हणून अनेक दुकानांमध्ये शुक्रवारीच लावले सूचना फलक खटाव तालुक्यातील मायणी येथे शुक्रवारीच बंद

सातारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दौंड येथील भीमाशंकर साखर कारखाना गळित हंगामाच्या उद्घाटनप्रसंगी केलेल्या विधानामुळे नाभिक समाजबांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. या विधानाच्या निषेधार्थ जिल्ह्यातील नाभिक समाज बांधवांनी सलून दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. याला सातारा, फलटणमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने दोन दिवसांपूर्वीच जिल्हाधिकाºयांना निवेदन देऊन दुकाने बंद ठेवण्याचा इशारा दिला होता. त्यामध्ये म्हटले होते की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानामुळे समाजबांधवांच्या भावना दुखावल्या आहेत.

याचा निषेध म्हणून शनिवारी एक दिवस दुकाने बंद ठेवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाभिक समाजबांधवांची माफी मागावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.वीर जिवाजी नाभिक समाज संघटनेचे सातारा शहराध्यक्ष संतोष साळुंखे, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष भानुदास वास्के, शंकर दळवी यांनी केलेल्या आवाहनाला समाज बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

ग्राहकांना आंदोलनाची माहिती व्हावी, व त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून अनेक दुकानांमध्ये शुक्रवारीच सूचना फलक लावले होते. खटाव तालुक्यातील मायणी येथे शुक्रवारीच बंद पाळण्यात आला होता. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरChakka jamचक्काजाम