शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

सातारा हादरलं! न्यायालय परिसरातच गुंड बंटी जाधवसह सहकाऱ्यांवर गोळीबार; संशयित पोलिसांच्या ताब्यात

By दीपक शिंदे | Published: August 07, 2023 5:10 PM

वाई : न्यायालय परिसरात दोन युवकांवर गोळीबार करण्यात आला आहे. वाई शहरात मध्यवस्तीत घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. या ...

वाई : न्यायालय परिसरात दोन युवकांवर गोळीबार करण्यात आला आहे. वाई शहरात मध्यवस्तीत घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर पाेलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे. गोळीबाराच्या या घटनेने जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्न पुन्हा एेरणीवर आला. आज, सोमवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली.  कुख्यात गुंड अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव (राहणार- भुईंज) आणि निखिल माेरे व अभिजीत शिवाजी मोरे (राहणार- गंगापुरी, वाई) यांच्यावर आज वाई न्यायालय परिसरात गोळीबार झाला. या तिघांना मेणवली (ता. वाई) येथील हॉटेल व्यावसायिकाला दहा लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करून दरोडा टाकल्याप्रकरणी पोलिसांनी कळंबा कारागृहातून नुकतीच अटक केली होती.त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. आज त्यांच्यावर न्यायालय परिसरात गोळीबार झाला. या घटनेनंतर न्यायालय परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला. प्राथमिक माहितीनूसार गोळीबार केल्याप्रकणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीFiringगोळीबारCourtन्यायालयPoliceपोलिस