शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; शिवसेना नेत्याचा दावा, नेमकं काय घडतंय?
2
विधानसभेत ७८ नवीन चेहरे, जे पहिल्यांदाच आमदार बनले; कोणत्या पक्षाचे किती सदस्य?
3
काँग्रेसनं कोणत्या मार्गावर चालायला हवं? राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं, ओढली 'लक्ष्मणरेषा'!
4
"2012 पर्यंत हरी मंदिर होते...", संभलच्या शाही जामा मशिदीसंदर्भात भाजप आमदाराचा नवा दावा! शेअर केले PHOTO
5
"प्रियांका गांधींच्या विजयानिमित्त वायनाडमध्ये निष्पाप गायीची हत्या"; धीरेंद्र शास्त्रींच्या पदयात्रेत रामभद्राचार्य यांचा आरोप!
6
Mumbai Indians फिरवली पाठ, Ishan Kishan ने ठोकले ९ षटकार, अवघ्या २७ चेंडूत जिंकवली मॅच
7
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
8
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
9
₹6 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, 600% नं वाढला भाव; या मोठ्या कंपनीनं 1600000 शेअरवर लावलाय 'डाव'!
10
IPL Auction 2025: Rishabh Pant वर लागली २७ कोटींची तगडी बोली, टॅक्स कापून हातात किती मिळणार?
11
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
12
टीम इंडियाने लाँच केली नवी जर्सी, झाला महत्त्वाचा बदल; पहिल्यांदा कधी मैदानात कधी दिसणार?
13
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
14
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
15
मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट
16
शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव
17
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
19
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
20
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...

असावा सुंदर; पण ‘सुरक्षित’ बंगला!

By admin | Published: August 30, 2015 9:59 PM

शंभर रुपयाचं कुलूप सांभाळतंय लाखोंची मालमत्ता : कऱ्हाडसह उपनगरांत २९ घरफोड्या; नऊ घरांच्या कुलपावरच चोरट्यांचा हातोडा; पोलीस हतबल

संजय पाटील - कऱ्हाड --काठीला सोनं बांधून फिरण्याचाही एक काळ होता, असं म्हणतात. पण, सध्या कडी-कुलपात ठेवलेली मालमत्ताही सुरक्षित राहिलेली नाही. फक्त रात्रीच नव्हे, तर दिवसाढवळ्याही पैसा आणि सोनं लुटलं जातंय. त्यामुळे सोनं आणि पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक उपाययोजना कराव्या लागतायत. मात्र, काहीजण लाखोंची मालमत्ता शंभर रुपयांमध्ये मिळणाऱ्या कुलपाच्या भरवशावर ठेवतायत आणि याच कमकुवत कुलपांमुळे चोरट्यांचं ‘काम’ हलकं होतंय. कऱ्हाडात घडलेल्या काही घरफोडींच्या घटनांवरून सध्या हे स्पष्ट झालंय.चोरी करण्यासाठी सराईत चोरटे विविध क्लृप्त्या लढवितात. बनावट चावीने दरवाजा उघडणे, दरवाजा फोडणे, खिडीकीतून प्रवेश करणे याचबरोबर काहीवेळा छताचा पत्रा उचकटून घरात प्रवेश करीत चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केल्याच्या घटना घडल्या आहेत. या सर्व प्रकारांबरोबरच दरवाजाचे कुलूप कटावणीने तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केल्याचे अनेक घटनांमध्ये दिसून आले आहे. कुलपाची बनावट चावी तयार करणे चोरट्यांना सहजशक्य नसते. त्याचबरोबर दरवाजा फोडणे किंवा छताचा पत्रा उचकटण्याचा प्रयत्न करताना मोठा आवाज होण्याचीही दाट शक्यता असते. त्यामुळे चोरटे कुलूप कटावणीने उचकटून घरात प्रवेश करण्याचा सर्रास प्रयत्न करतात. त्यातच कुलूप हलक्या प्रतीचे असेल तर ते चोरट्यांना फायदेशीर ठरते. कटावणीवर हलकासा दाब दिला तरी हलक्या प्रतीचे कुलूप लगेच तुटते. याचाच गैरफायदा चोरट्यांकडून घेतला जातो. कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गत सात महिन्यांमध्ये घरफोडीच्या २९ घटना घडल्या आहेत. त्यापैकी बहुतांश घटनांमध्ये चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. बहुतांश नागरिक किमती ऐवज व लाखोंची रोकड घरामध्ये ठेवतात. घरातील कपाटातच अशा वस्तू हमखासपणे ठेवल्या जातात आणि घराबाहेर पडताना दरवाजाला फक्त कुलूप लावले जाते. लाखोंचा ऐवज फक्त त्या कुलपाच्या भरशावर असतो; पण असे असताना संबंधित कुलपाच्या दर्जाबाबत म्हणावे तेवढे गांभीर्य दाखविले जात नाही. बाजारात अगदी पन्नास रुपयांपासून कुलूप उपलब्ध असल्यामुळे पैसे वाचविण्यासाठी अनेकजण हलक्या प्रतीची कमकुवत कुलपे विकत घेतात. भविष्यात त्याचाच मोठा फटका संबंधित कुटुंबाला सहन करावा लागतो. कुलपात शंभर-दोनशे रुपयांची बचत करताना कधीकधी लाखोंची किंमत मोजावी लागते. शहर परिसरात झालेल्या एकूण घरफोड्यांपैकी बहुतांश घरफोड्या कुलूप तोडून झाल्या आहेत. पोलीस दप्तरीही तशी नोंद आहे. मात्र, एवढे होऊनही घराच्या सुरक्षिततेबाबत गांभीर्याने विचार केला जात नाही.दिवसा सहा, रात्री तेवीस घरफोड्याघरफोडीच्या घटनांची पोलीस दप्तरी नोंद केली जात असताना दिवसा व रात्री या दोन प्रकारांमध्ये ती केली जाते. कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जानेवारी ते जुलैअखेर या सात महिन्यांमध्ये २९ घरफोड्या झाल्या. यामध्ये काही दुकानांचाही समावेश आहे. एकूण २९ घरफोड्यांपैकी दिवसा झालेल्या घरफोड्यांची संख्या सहा तर रात्रीच्या घरफोड्यांची संख्या तेवीस आहे. तर यापैकी नऊ ठिकाणी चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केल्याचे पोलीस तपासातून उघड झाले आहे.सुरक्षित घरासाठी पोलिसांनी सुचविलेल्या उपाययोजना‘इलेक्ट्रॉनिक सेक्युरिटी सिस्टीम’ वापरणे प्रत्येकाच्या बजेटमध्ये नसते. मात्र, दरवाजाचे कुलूप चांगल्या दर्जाचे असावे, याची खबरदारी घ्यावी.आवश्यकतेपेक्षा जास्त किमती ऐवज घरामध्ये ठेवणे टाळावे. किमती ऐवज बँकेच्या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवावा.मुख्य दरवाजाच्या बाहेरील बाजूस लोखंडी ग्रीलचा दरवाजा बसवावा. ज्यामुळे सहजासहजी दरवाजाच्या कुलपापर्यंत पोहोचता येत नाही.घर जास्त दिवस बंद राहणार असेल तर त्याची कल्पना शेजाऱ्याला द्यावी. किंवा जवळच्या नातेवाइकाला लक्ष ठेवण्यास सांगावे. शक्य असल्यास घराच्या बाहेरील बाजूस तसेच हॉलमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसवावी.उपनगरे ‘हिटलिस्ट’वर कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शहरासह मलकापूर, आगाशिवनगर, विद्यानगर, सैदापूर व ओगलेवाडी या उपनगरांमध्ये घरफोडीच्या घटनांचे प्रमाण जास्त आहे. गत सात महिन्यांत झालेल्या २९ घरफोड्यांपैकी बहुतांश घरफोड्या मलकापूर व विद्यानगर परिसरात झाल्याचे पोलीस रेकॉर्डवरून स्पष्ट होते.