बोरगाव : कृष्णा कारखान्याच्या सभासदांचा हक्क हिरावून घेण्यासाठी हायकोर्टात खेटे घालणाऱ्या बाप-लेकांना या निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे. सभासदांनो आता चुकलो तर त्याचे दूरगामी परिणाम भोगावे लागतील, असे प्रतिपादन संस्थापक पॅनेलचे प्रमुख अविनाश मोहिते यांनी केले.
बोरगाव (ता. वाळवा) येथे संस्थापक पॅनेलच्या प्रचार प्रारंभप्रसंगी ते बोलत होते.
शिवाजी चौकातील ग्रामदैवत हनुमान मंदिरात प्रचार प्रारंभ करण्यात आला. मोहिते म्हणाले, सुरेश भोसले व अतुल भोसले या पिता-पुत्रांनी कृष्णा कारखान्याच्या मालकीच्या सर्व संस्था स्वत:च्या खासगी मालकीच्या बनविल्या आहेत. आता कृष्णा कारखाना खासगी करण्याचा घाट घातला आहे. तो आता मोडून काढायला हवा. नाही तर हे बाप-लेक कृष्णा कारखाना खासगी करणारच यात शंका नाही.
त्यामुळे आता या पिता-पुत्रांची त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे.
जयसिंग शिंदे यांनी स्वागत केले. सचिन पाटील यांनी आभार मानले.
या वेळी राजारामबापू कारखान्याचे संचालक कार्तिक पाटील, उदयसिंह शिंदे, मानाजी पाटील, प्रकाश वाटेगावकर जगन्नाथ पाटील, भगवान शिंदे, उमेश पाटील व परिसरातील सभासद उपस्थित होते.
चौकट
संचालकांच्या वाड्यातून कारभार..
कृष्णा कारखान्याच्या गट ऑफिसचा कारभार संचालकांच्या वाड्यातून चालतो. तिथूनच कोणाचा ऊस तोडायचा हे ठरते. मोदी बनून हुकूमशाही नांदवून माझ्याच घरात सर्व पदे पाहिजेत, असा हट्ट काहीजण करत आहेत, अशी टाेलेबाजी राजारामबापू सूतगिरणीचे संचालक व कृष्णेचे माजी संचालक उदयसिंह शिंदे यांनी जितेंद्र पाटील यांचे नाव न घेता केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरगाव : कृष्णा कारखान्याच्या सभासदांचा हक्क हिरावून घेण्यासाठी हायकोर्टात खेटे घालणाऱ्या बाप-लेकांना या निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे. सभासदांनो आता चुकलो तर त्याचे दूरगामी परिणाम भोगावे लागतील, असे प्रतिपादन संस्थापक पॅनेलचे प्रमुख अविनाश मोहिते यांनी केले.
बोरगाव (ता. वाळवा) येथे संस्थापक पॅनेलच्या प्रचार प्रारंभप्रसंगी ते बोलत होते.
शिवाजी चौकातील ग्रामदैवत हनुमान मंदिरात प्रचार प्रारंभ करण्यात आला. मोहिते म्हणाले, सुरेश भोसले व अतुल भोसले या पिता-पुत्रांनी कृष्णा कारखान्याच्या मालकीच्या सर्व संस्था स्वत:च्या खासगी मालकीच्या बनविल्या आहेत. आता कृष्णा कारखाना खासगी करण्याचा घाट घातला आहे. तो आता मोडून काढायला हवा. नाही तर हे बाप-लेक कृष्णा कारखाना खासगी करणारच यात शंका नाही.
त्यामुळे आता या पिता-पुत्रांची त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे.
जयसिंग शिंदे यांनी स्वागत केले. सचिन पाटील यांनी आभार मानले.
यावेळी राजारामबापू कारखान्याचे संचालक कार्तीक पाटील, उदयसिंह शिंदे, मानाजी पाटील, प्रकाश वाटेगावकर जगन्नाथ पाटील, भगवान शिंदे, उमेश पाटील व परिसरातील सभासद उपस्थित होते.
चौकट
संचालकांच्या वाड्यातून कारभार..
कृष्णा कारखान्याच्या गटा ऑफिसचा कारभार संचालकांच्या वाड्यातून चालतो. तिथूनच कोणाचा ऊस तोडायचा हे ठरते. मोदी बनून हुकूमशाही नांदवून माझ्याच घरात सर्व पदे पाहिजेत, असा हट्ट काहीजण करत आहेत, अशी टाेलेबाजी राजारामबापू सूतगिरणीचे संचालक व कृष्णेचे माजी संचालक उदयसिंह शिंदे यांनी जितेंद्र पाटील यांचे नाव न घेता केली.