दहिवडी (जि. सातारा) : वावारहिरे (ता. माण) येथे बहुउदेशीय सत्यशोधक केंद्र वावरहिरे व फुले-शाहू-आंबेडकर एज्युकेशन आणि सोशल फाउंडेशन पुणे अध्यक्ष रघुनाथ ढोक यांच्या पुढाकाराने सत्यशोधक पद्धतीने पहिला विवाह पार पडला.
गणेश जालिंदर कापसे आणि ज्योती नामदेव शिंदे यांचा दि.६ मे रोजी, तर व मंगेश आनंदराव गोरे डंगिरेवाडी व प्रियांका बापूराव कापसे वावरहिरे यांचा शुक्रवारी महात्मा फुले यांना अभिप्रेत असलेल्या सत्यशोधक पद्धतीने विवाह करण्यात आला. पहिला विवाह ६ तारखेला, तर दुसऱ्या जोडप्याचा विवाह शुक्रवारी झाला. महात्मा फुले यांच्या वेशभूषेत रघुनाथ ढोक यांनी फुले-शाहू-आंबेडकर एज्युकेशन अँड सोशल फाउंडेशनचे बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे विवाह लावून महात्मा फुले व सावित्रीबाई फुले प्रतिमा भेट दिली. याप्रसंगी कापसे व ढोक आणि कापसे व गोरे यांनी सर्वांना विविध प्रकारची तीनशे झाडे आणि मुलींना व महिलांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले तसेच दीनांची सावली हे १९१ ग्रंथ महात्मा फुले जयंतीनिमित्त वाटप केले.
जुन्या रुढीला फाटा देत या नवदाम्पत्यांनी समाजाला जाणीव करून दिली. यापुढेही असे विवाह झाल्यास सलोखा निर्माण होईल, आशी भावना लोकांनी व्यक्त केली.सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी या लग्नाला शुभेच्छा संदेश दिला असून, सोहळ्यात हजर असणाºया मंडळींनी अशा प्रकारचा विवाह करावा, असे आवाहन केले.दोनशेहून अधिक वºहाडींकडून श्रमदानविवाहाची हळद लागण्यापूर्वी वावरहिरे येथे श्री पाणलिंग पठारावर पाणी फाउंडेशनसाठी वधू-वर आणि त्यांचे दोन्हीकडील दोनशेहून अधिक वºहाडींनी श्रमदान करून आपल्या माण भागाचा दुष्काळ हटविण्यासाठी प्रयत्न केला. त्यांनी सामाजिक जाणिवेतून काम केल्याने ग्रामस्थांनी व आमदार जयकुमार गोरे सरपंच चंद्रकांत वाघ आणि बँकेचे अनिल देसाई, दहिवडीचे नगरसेवक सतीश जाधव, रघुनाथ ढोक यांनी त्यांचे कौतुक केले. पाणी फाउंडेशन कोअर टीम आणि हजारोंच्या संख्येने जनसमुदाय यावेळी उपस्थित होता.