रामापूर : ‘श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेस चालू आर्थिक वर्षात २.४९ लाखांचा ढोबळ नफा झाला आहे. सभासदांना ९ टक्क्यांप्रमाणे लाभांश, तर सेवकांना २० टक्क्यांप्रमाणे बोनस दिला आहे,’ अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष विलासराव क्षीरसागर यांनी दिली.
क्षीरसागर म्हणाले, ‘संपलेल्या आर्थिक वर्षात श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवी ७८ कोटी ५ लाख, तर कर्ज व्यवहार ५४ कोटी ६ लाख रुपये, गुंतवणूक ४२ कोटी ४६ लाख आहे. एकूण व्यवसाय १३२ कोटी ११ लाख झाला आहे. मार्गदर्शक अमरसिंह पाटणकर यांच्या आवाहनानुसार कोरोना नियंत्रणासाठी मुख्यमंत्री निधीस एक लाख रुपये दिले आहेत. सत्यजितसिंह पाटणकर यांच्या आवाहनानुसार सॅनिटायझरसाठी, ऑक्सिजन बेडकरिता १ लाख २६ हजार २५० रुपयांची मदत केली. यावेळी उपाध्यक्ष हिंदुराव सुतार, डाॅ. राहुल मोकाशी, सूर्यकांत प्रभाळे, जयवंतराव पवार, इब्राहीम हकीम, मनीष चौधरी, अनंत पवार, दीपक खांडके, हिराजी शेळके, विमल कुंभार, कविता माथणे, मुरलीधर पवार, बजरंग काटे, दीपकसिंह पाटणकर, लहू शंकर माने उपस्थित होते. (वा.प्र.)