रहिमतपूर : कृषी कायद्याविरोधात दिल्लीत आंदोलन करत असलेल्या शेतकरी संघटनांनी भारत बंदची हाक दिली होती. या हाकेला कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूरकरांनी दुकानांचे शटर डाऊन करून कडकडीत बंद पाळून प्रतिसाद दिला.
कृषी विधेयक २०२० रद्द करावे किंवा नव्याने कायदा करून हमीभाव लागू करावा, अशी मागणी करत शेतकरी संघटनांनी दिल्ली येथे आंदोलन सुरू केले आहे. शेतकरी संघटनांनी देशभरातील शेतकऱ्यांना दि. २६ मार्च राेजी भारत बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत रहिमतपूर बंद ठेवण्याचा निर्णय स्वयंस्फूर्तीने शेतकरी व व्यापाऱ्यांनी घेतला. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनीही कडकडीत बंद पाळावा, असे आवाहन केले होते. रहिमतपूर येथील अत्यावश्यक सेवा वगळता शेतकरी, व्यापारी, भाजीपाला विक्रेते आदींनी दुकाने बंद ठेवून बंदमध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे नेहमी गजबजलेल्या गांधी चौक, शिवरात चौक आदी चौकात सन्नाटा पसरला होता.
२६रहिमतपूर
फोटो : रहिमतपूर, ता. कोरेगाव येथील सर्व दुकाने व बाजारपेठ बंद ठेवल्याने रस्ते ओस पडले होते. (छाया : जयदीप जाधव)