स्पर्धेतील दि्वतीय क्रमांक भारतमाता वडूथ संघाने अमित लावंघरे, विजय इंदलकर पुरस्कृत ११ हजार १११ रुपयांचे दि्वतीय क्रमांकाचे रोख बक्षीस व चषकावर नाव कोरले. तृतीय क्रमांकाचे बक्षीस विजय हनुमान मंडळ किडगाव संघाने अरुण कापसे व नामदेव सावंत पुरस्कृत ७ हजार ७७७ रुपयांचे रोख पारितोषिक व आकर्षक चषक मिळवला. या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांक विजेत्या सनसनाटी ग्रुप टाळगाव यांनी महेश गाडे पुरस्कृत ५ हजार ५५५ रुपयांचे पारितोषिक व चषक मिळवला. या स्पर्धेतील सर्व चषक अक्षय मतकर यांच्याकडून देण्यात आले.
उत्कृष्ट चढाईपटू म्हणून सिद्धिविनायक ग्रुप सातारचा खेळाडू गणेश आवळे याची निवड करण्यात आली. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून अविनाश सनसनाटी संघ टाळगाव यांची निवड झाली. पंच म्हणून काका भिसे, रत्नदीप इंगवले, सुभाष साबळे, भास्कर साबळे, संजय जाधव, अविनाश ढमाळ यांनी काम पाहिले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सचिन इंगवले, संतोष इंगवले, पंकज चतुर, शफीक फरास, सचिन इंगवले, अमोल मेणकर, अतुल इंगवले, विक्रम इंगवले, गौरव इंगवले, विवेक शेडगे, जयवंत टिळेकर, गजानन पाटील, मंदार मेणकर यांनी प्रयत्न केले.