शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

श्री खंडोबा-म्हाळसा मूर्तींसाठी चांदीचे सिंहासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 11:06 PM

उंब्रज : ‘महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले पाल, ता. कºहाड येथील श्री खंडोबा व म्हाळसा यांच्या मूर्तींसाठी भाविकांच्या मदतीतून सात लाख रुपये किमतीचे चांदीचे सिंहासन बनविण्यात आले आहे,’ अशी माहिती मार्तंड देवस्थानचे अध्यक्ष व कºहाड पंचायत समितीचे माजी सभापती देवराज पाटील यांनी दिली.श्री खंडोबा व म्हाळसा यांच्या ...

उंब्रज : ‘महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले पाल, ता. कºहाड येथील श्री खंडोबा व म्हाळसा यांच्या मूर्तींसाठी भाविकांच्या मदतीतून सात लाख रुपये किमतीचे चांदीचे सिंहासन बनविण्यात आले आहे,’ अशी माहिती मार्तंड देवस्थानचे अध्यक्ष व कºहाड पंचायत समितीचे माजी सभापती देवराज पाटील यांनी दिली.श्री खंडोबा व म्हाळसा यांच्या मूर्तींच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातील लाखो भाविक पाल येथील मंदिरात हजेरी लावतात. दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढतच आहे. आराध्य दैवत म्हणून श्री खंडोबाकडे पाहिले जाते. येथे येणारे भाविक हे आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार श्री खंडोबासाठी वस्तू रुपाने सोने, चांदी तसेच वेगवेगळ्या वस्तू दान करीत असतात. यात रोख रकमेचाही समावेश असतो. येथे अर्पण केलेल्या चांदीपासून श्री खंडोबा व म्हाळसा यांच्या मूर्तीसाठी चांदीचे सिंहासन करण्यात आले आहे. यामध्ये ४ लाख ४६ हजार रुपये किमतीची ११ किलो चांदी, १ लाख ६७ हजार रुपये किमतीचे ६६ किलो पितळ आणि जवळपास ७५ हजार रुपये किमतीचे सागवानाचे लाकूड वापरून सुमारे ६ लाख ९० हजार रुपये किमतीचे आकर्षक असे सिंहासन तयार करण्यात आले आहे.श्री खंडोबा व म्हाळसा यांच्या मूर्तींच्या दोन्ही बाजूस पितळपासून दोन सिंह तयार करण्यात आले आहेत. या सिंहासनावरील चांदी व पितळवर कलाकुसर करण्यात आली आहे. त्याचे काम कोल्हापूर येथील विजय तांबट यांनी केले आहे. सागवानी लाकडावरील कलाकुसरीचे काम पाटण येथील अरविंद कुंभार यांनी केले आहे. सर्वांच्या प्रयत्नातूनच चांदीचे आकर्षक असे सिंहासन साकार झाले आहे. यामुळे श्री खंडोबा मंदिराच्या वैभवात भर पडली आहे, असेही देवराज पाटील यांनी सांगितले.उपाध्यक्ष रघुनाथ खंडाईत, संचालक संजय काळभोर, उत्तम गोरे, दीपक दीक्षित उपस्थित होते.भाविकांचेआकर्षण राहणार...लवकरच यात्रा सुरू होत आहे. तर दि. ३१ डिसेंबर रोजी श्री खंडोबा व म्हाळसा यांचा विवाह सोहळा पाल नगरीत संपन्न होत आहे. यावर्षी प्रथमच श्री खंडोबा व म्हाळसा यांची मूर्ती चांदीच्या सिंहासनावर पाहण्यास भाविकांना मिळणार आहे. यावर्षी यात्रेत चांदीचे सिंहासन हे भाविकांचे आकर्षण ठरणार आहे.

टॅग्स :TempleमंदिरSatara areaसातारा परिसर