शहरं
Join us  
Trending Stories
1
जय शाहंची ऐतिहासिक घोषणा! IPL खेळणाऱ्यांना 'बोनस', कराराच्या रकमेव्यतिरिक्त लाखोंचा वर्षाव
2
"पुण्यात आता चंद्रावर जाण्याचा उद्योग होतोय", शरद पवारांचा महायुतीला खोचक टोला
3
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
4
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
5
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
6
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
7
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
8
हिजबुल्लाहच्या नसरल्लाहचा 'खात्मा'; आता खामेनेईंचं टेनन्शन वाढलं; इस्रायलवर भडकले अन् अंडरग्राउंड झाले!
9
"महालक्ष्मी ब्लॅकमेल करत होती, म्हणून ५९ तुकडे..."; बंगळुरू हत्येतील आरोपीच्या भावाचा मोठा दावा
10
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
11
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
12
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
13
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
14
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
15
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
16
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
17
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
18
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच
19
बाबो! नवरी जोमात, नवरदेव कोमात; लग्नाच्याच दिवशी केली शॉपिंग, पैसे घेऊन नववधू पसार
20
पावसाचा कहर! उत्तर प्रदेशमध्ये ८ जणांचा मृत्यू; अनेक घरांची पडझड, ३०० गावांतील वीज खंडित

साताऱ्यात उंटांची ‘सैराट’गिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 11:06 PM

स्वप्नील शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘सैराट’ मराठी चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं. त्याचे हिंदीसह अनेक भाषेत रिमेक निघाले. या चित्रपटाची क्रेझ अजूनही कमी झाली नाही. साताºयातील एका तरुणाने चक्क आपल्याकडील सात उंटांना या चित्रपटातील कलाकरांची नावे दिली असून, उंटांची ही ‘सैराट’गिरी सातारकरांच्या कुतूहलाचा विषय ...

स्वप्नील शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘सैराट’ मराठी चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं. त्याचे हिंदीसह अनेक भाषेत रिमेक निघाले. या चित्रपटाची क्रेझ अजूनही कमी झाली नाही. साताºयातील एका तरुणाने चक्क आपल्याकडील सात उंटांना या चित्रपटातील कलाकरांची नावे दिली असून, उंटांची ही ‘सैराट’गिरी सातारकरांच्या कुतूहलाचा विषय बनली आहे.नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या चित्रपटाने आजपर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढत मराठी सिनेमासृष्टीत सर्वाधिक कमाई करण्याचा बहुमान पटकाविला. या चित्रपटाचे संगीतकार अजय-अतुल यांच्या गाण्यांनी तर तरुणांना झिंगाट केलं होतं. आजही अनेकांच्या मोबाईलच्या रिंगटोनवर सैराटचीच गाणी वाजत असतात. या चित्रपटात प्रमुुख भूमिका करणाºया परश्या व आर्ची या पात्रांचे डायलॉग अन् त्यांच्या अनोख्या प्रेमकथेने युवा पिढी भारावून गेली. या चित्रपटाला दोन वर्षे झाली तरी यातील पात्र, त्यांची नावे अन् डायलॉगची क्रेझ आजही पाहावयास मिळत आहे.साताºयातील निहाल खरात या तरुणाकडे सात उंट आहेत. त्याला सैराटमधील कलाकारांनी इतकी भुरळ घातली की त्याने आपल्या सातही उंटांना परश्या, आर्ची, सल्या, लंगड्या, आनी, आकाश व प्रशांत अशी नावं दिली आहेत. तो एवढ्यावरच थांबला नाही. त्याला झिंगाट, सैराट झालंजी, आतागं बय्या ही गाणी खूप आवडतात. त्याच्या मोबाईलवरील हीच गाणी उंटांनाही ऐकण्याची सवय झाली आहे. उंटही नाचत असतात.तीन उंटांना परश्याची नावेपरश्या हे पात्र आकाश ठोसरने स्वत:च्या सहजसुंदर अभिनयाने अगदी उत्तमपणे साकारले आहे. त्याने साकारलेल्या चॉकलेट हिरोची भूमिका आवडल्याने निहालचा आकाश सर्वात आवडता अभिनेता झाला आहे. त्यामुळे त्याने सातपैकी तीन उंटांना परश्या, प्रशांत आणि आकाश अशी नावे दिली आहेत.उंटांवर कुटुंबाचा उदरनिर्वाह...निहाल खरात हा गेल्या अनेक वर्षांपासून उंटाचे संगोपन करत आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी फिरून लोकांना उंटावर बसवणे, लग्न, तसेच मिरवणुकीत उंट भाड्याने देणे यातून मिळणाºया पैशांवर कुटुंबाची गुजराण करणे असा दिनक्रम निहालचा सतत सुरू असतो. या सात उंटांवर त्याच्या कुटुंबातील पंधरा सदस्यांचा उदरनिर्वाह चालतो. हे उंटच त्यांच्या जगण्याचे मुख्य साधन आहेत.