शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

पुण्याजवळ सहाजण ठार

By admin | Published: June 11, 2015 10:55 PM

सांगवीवर शोककळा : डंपरची आठ वाहनांना धडक

आंबेगाव बुद्रुक (पुणे) : चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे एका डंपरने पाच मोटारी, दोन दुचाकी आणि एका सहा आसनी रिक्षाला धडक देत सहाजणांचा बळी घेतला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन मोटारींवरच हा डंपर उलटल्याने मोटारींचा अक्षरश: चक्काचूर झाला. यातील एका मोटारीमधील चारजणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक मुलगी बचावली. मृतांमध्ये सातारा जिल्ह्यामधील एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. हा अपघात गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास पुणे-बंगलोर महामार्गावर वडगाव पुलाजवळ घडला. घटनास्थळावर डंपरमधील खडी पसरली होती.रवींद्र तुकाराम सावंत (वय ३५), सारिका रवींद्र सावंत (३०), रेवती रवींद्र सावंत (१०, सर्व, रा. सांगवी, ता. जावळी, जि. सातारा), सुभाष विनायक चौधरी (२९, रा. सुदाम पाटील चाळ, रामनगर, डोंबिवली), बालाजी तुकाराम राठोड (२५), महेंबर यादव गायकवाड (२३, रा. शिर्गापूर, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) अशी मृतांची नावे आहेत, तर भालचंद्र विठ्ठल कालुरकर (४२), रुपेश राजेंद्र पळसदेवकर (३४) बाळासाहेब विठ्ठल घाडगे (५६), शरद सर्जेराव मोरे (५४) हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर तीन विविध खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. डंपर चालक मात्र अपघातानंतर पसार झाला.असा झाला अपघातखडी आणि डांबराचे मिश्रण घेऊन वारज्याच्या दिशेने येणाऱ्या दहा चाकी डंपरवरील चालकाचे नियंत्रण सुटले. नऱ्हेजवळील तीव्र (पान १वरून) व्होल्वो बसला धडक दिली. ती एवढी जोरात होती की, बसची एका जीपला धडक बसली. ही बस दुभाजकावर चढून पुढे जात झाडाला धडकल्यामुळे थांबली. सुदैवाने या बसमध्ये कुणी प्रवासी नव्हते. प्रचंड वेगात असलेल्या या डंपरने नंतर तवेरा गाडीला ठोकरले आणि पुढे जाऊन सहा आसनी रिक्षाला धडक दिली. या धडकेत सहा आसनी रिक्षाचे दोन तुकडे झाले. त्यानंतर तीन दुचाकींना धडक देत पुन्हा एका मोटारीला डंपरची धडक बसली. वडगाव पुलाच्या सुरुवातीलाच रस्त्याच्या बाजूला ओम्नी आणि सॅन्ट्रो कार उभ्या होत्या. सॅन्ट्रोमध्ये पाचजण होते.भरधाव डंपरने सॅन्ट्रोला धडक दिल्यानंतर ओम्नीसह तिन्ही गाड्या पुलाचा कठडा तोडून सेवा रस्ता आणि महामार्गाच्या मधे असलेल्या मोकळ्या उतारावर घसरत गेल्या. तेथे मोठ्या झाडांना या गाड्या जाऊन धडकल्यामुळे थांबल्या; परंतु ओम्नी आणि सॅन्ट्रो डंपरखाली दबल्या गेल्या.अग्निशामक दलाच्या जवानांनी कटरच्या साहाय्याने चक्काचूर झालेल्या गाड्यांचे पत्रे कापून मृतदेह बाहेर काढले. एका मुलीला जिवंत बाहेर काढण्यात त्यांना यश आले.कुडाळ : पुणे येथे झालेल्या अपघातात जावळी तालुक्यातील सांगवी गावातील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने सांगवी गाव शोकसागरात बुडाले.रवींद्र सावंत हे कुटुंबीयांसमवेत मुंबईला स्थायिक झाले होते. ते पत्नी सारिका आणि रचना व रेवती या दोन मुलींसमवेत सांगवी या मूळगावी सुटीसाठी आले होते. दरम्यान, गुरुवारी त्यांनी सकाळी आपली वृद्ध आई इंदुबाई यांना कुडाळ येथून बाजार आणून दिला. त्यानंतर ते सुटी संपवून कुटुंबासमवेत मुंबईला निघाले होते. ‘मुंबईत पोहोचताच फोन कर,’ असं आई इंदुबाई यांनी बजावून सांगितले होते. त्यामुळे त्या मुलाच्या फोनच्या प्रतीक्षेत होत्या. मात्र, अचानक त्यांच्या अपघाताची बातमी सांगवीत धडकताच गावात शोककळा पसरली. मुलासह सून आणि नातीच्या मृत्यूची बातमी इंदुबार्इंना कशी सांगायची, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला; परंतु धाडस करून काहींनी इंदुबार्इंना या दुर्दैवी अपघाताची माहिती देताच इंदुबार्इंनी एकच आक्रोश केला. गावासह पंचक्रोशीत वाऱ्यासारखी बातमी पसरली. त्यामुळे सावंत यांच्या घराकडे गर्दी वाढू लागली.ग्रामस्थांना अश्रू अनावररवींद्र सावंत हे मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांनी मुंबईत व्यवसायात भरभराट करीत आपला व्यवसाय स्थिरस्थावर केला होता. त्यामुळे गावकऱ्यांना त्यांचा अभिमान असायचा; मात्र सावंत कुटुंबावर काळाने घाला घातल्याने गावकऱ्यांनाही अश्रू अनावर झाले.