शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
2
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
3
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
4
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
5
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
6
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
7
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
8
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
9
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
10
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
11
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
12
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
13
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
14
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
15
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
16
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?
17
योगींसह 'या' नेत्यांच्या सुरक्षेतून NSG चे ब्लॅक कॅट कमांडो हटवणार, सरकारने आखली नवीन योजना
18
भारत जगाचे नेतृत्व करणार; 6G बाबत सरकारची मोठी घोषणा, Jio-Airtel-BSNL-Vi ग्राहकांना...
19
रशिया-युक्रेन युद्धाचा भारताला मोठा फटका! ३ अब्ज डॉलर्सच्या करारवर सही झाली, पण...
20
"उद्धव ठाकरे आजारी पडल्याचं टायमिंग साधून निवडणुकीची घोषणा, त्यामागे षडयंत्र तर नाही ना?’’ ठाकरे गटाला शंका

साठ लाख पाण्यात; पण तहान भागेना !

By admin | Published: March 11, 2017 10:45 AM

उरुलचा प्रकल्प झुडपांनी वेढला : आठ वर्षांपासून भिजत घोंगडे कायम; पाणीसाठाच नाही, प्रकल्पग्रस्त शेतकरी वाऱ्यावर

साठ लाख पाण्यात; पण तहान भागेना !उरुलचा प्रकल्प झुडपांनी वेढला : आठ वर्षांपासून भिजत घोंगडे कायम; पाणीसाठाच नाही, प्रकल्पग्रस्त शेतकरी वाऱ्यावरमल्हारपेठ : शासनाच्या दुर्लक्षतेमुळे आठ वर्षांपासून उरुल लघुपाटबंधारे प्रकल्पाचे भिजत घोंगडे आहे. अंदाजे साठ लाख रुपये मातीमोल झाले आहेत. ३० फूट माती-मुरूमाची भिंत अर्धवट अवस्थेत उभी असून, त्यावर बाभूळ व झाडेझुडपांनी अतिक्रमण केले आहे. आठ वर्षांत घोटभर पाणी साठले नसून जैसे थे अवस्थेत प्रकल्प पूर्णत्वाची वाट पाहत आहे. रखडलेला लघुपाटबंधारे प्रकल्प कोणत्या वर्षी पूर्ण होणार?, असा सवाल उपस्थित होत आहे. मल्हारपेठ येथून पाच किलोमीटरवर असणारा उरुल लघुपाटबंधारे प्रकल्प आठ वर्षांपासून बंद आहे. प्रकल्पग्रस्त व उरुल भागातील ग्रामस्थ याबाबत तक्रार करत नाहीत की बोलतही नाहीत. प्रकल्पात उरुल गावची ३६ एकर व ठोमसे बोडकेवाडीची २८ एकर क्षेत्र बाधित झाले आहे. ठोमसे गावाचा जाणारा रस्ता पाण्याखाली जाणार होता. म्हणून संबंधित ठेकेदाराने पर्यायी रस्ता म्हणून अगोदरच उत्खनन केले आहे. परंतु रस्त्याची दिशा व दशा काय असणार व रस्ता कोठून होणार याबाबत ग्रामस्थ संभ्रमावस्थेत आहेत. तसेच ठोमसे गावाची सार्वजनिक पाणीपुरवठा विहीर व स्मशानभूमी ही बुडीत क्षेत्रात जात असल्यामुळे त्याला पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे. नुकताच लघुपाटबंधाऱ्याने कालव्याऐवजी बंदिस्त पाईपलाईनचा सर्व्हे केला. लोकांच्या जीवनावश्यक गोष्टींचा विचार न करता पाणी साठविण्यासाठी प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने विचार न करता. बंदिस्त पाईपलाईनचा सर्व्हे हे गणित ग्रामस्थांच्या लक्षात आले नाही. प्रकल्पाची अर्धी भिंत बांधून तयार आहे. बंधाऱ्याच्या उत्तरेकडील बाजूने पाण्याच्या सांडव्याचे काहीही काम झाले नाही. तो अर्धवट अवस्थेत असून सांडवा बांधण्यासाठी लागणारी खडी, वाळू, स्टिल, सळी अज्ञातांनी गायब केली आहे. पाटण तालुक्यातील बराच भाग ओलिताखाली आला आहे. मात्र, उरुल भाग ओलितापासून वंचित आहे. उरुल भागातील ठोमसे, बोडकेवाडी, तांबेवाडी, मोरेवाडी, पोळाचीवाडी, बौद्धवस्ती, सनगरवाडी गावाचे शेतकरी आज ही पाण्यासाठी चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. प्रकल्पाखाली दोन हजार ५०० एकर क्षेत्र ओलिताखाली आले असते. आज येथील शेतकरी कोरडवाहू शेती, पशुपालन करून कसेबसे पोट भरत आहेत. प्रकल्प झाला असता तर प्रकल्पाच्या दोन्ही काठाला असणारी सुपीक जमीन सुजलाम् सुफलाम् झाली असती. आठ वर्षे काम बंद झाल्यापासून प्रकल्प स्थळावरील एक दगड ही हललेला नाही. त्यामुळे हा प्रकल्प पूर्णत्वास जाईल, अशी आशा धुसर होत चालली आहे. आजअखेर प्रकल्पग्रस्तांना आठ वर्षांत उत्खनन केलेल्या जमिनीचे दोन वेळा तुटपुंजे भुईभाडे खातेनिहाय मिळाले आहे. मात्र, आजपर्यंत बाधित शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. आघाडी शासनाच्या काळात तत्कालीन जलसंपदा मंत्री अजितदादा पवार यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन दिले होते. त्यावर काहीच कार्यवाही झाली नाही. आज केंद्र व राज्यात युतीचे सरकार असून, तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई यांनी पाटण तालुक्यातील रखडलेल्या प्रकल्पांना निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी विधानभवनात केली होती. यावर काही उपाययोजना वरिष्ठ पातळीवर झाली की नाही? हेही उरुल भागातील ग्रामस्थांना कळले नाही. वारंवार ग्रामस्थ लघुपाटबंधारे विभागास ग्रामस्थ विचारत आहेत. मात्र, निधीबाबत शासनाकडे चर्चा सुरू आहे एवढेच उत्तर मिळत आहे. (वार्ताहर)प्रकल्पाचे साहित्य भंगारातप्रकल्पाच्या बाधित क्षेत्रातील विहिरी, पाईपलाईन, फळ झाडे, साग, जांभूळ व जळावू झाडे नामशेष झाली असून, त्यांचे पंचनाम्याचे ही काम पूर्ण झाले आहे. त्याठिकाणी पुन्हा मोठमोठी झाडे आली आहेत. कामासाठी आलेले लोखंडी साहित्य अज्ञात चोरट्यांनी भंगार जमा केले असल्याची चर्चा आहे. आठ वर्षांपूर्वी प्रकल्पाचे काम चालू असताना बाधित शेतकऱ्यांनी संबंधित ठेकेदार व प्रशासनाला वारंवार भरपाई मागीतली मात्र ती न दिल्यामुळे अनेक वेळा प्रकल्पाचे काम बंद पाडले होते. ते बंदच अवस्थेत आहे.अडीच वर्षांत छदामही नाहीकारखाना कार्यस्थळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व इतर अर्धा डझन मंत्री अडीच वर्षांच्या काळात येऊन गेले. मुख्यमंत्री आमदार देसार्इंचे मित्र असून सुद्धा प्रकल्पाला अडीच वर्षांत एक छदामही मिळालेला नाही. आजपर्यंत विधानसभा व जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत भरभरून मतदान देणाऱ्या उरुल भागातील जनतेची अशा प्रकारे चाललेली फरफट या अर्थसंकल्पात तरी पूर्ण होणार का?, असा सवाल उरुल भागातील वाड्या-वस्तीतून होत आहे.महिन्यापूर्वी लघुपाटबंधारे विभागाने बंधाऱ्याच्या खालील बाजूस प्रत्येक क्षेत्रासाठी कालव्याऐवजी बंदिस्त पाईपलाईन करून शेतीला पाणीपुरवठा करण्याबाबत अहवाल तयार केला आहे. मात्र, बंधाऱ्याचे काम पूर्ण नसून पुढील पाण्याचे नियोजन का केले गेले हे लोकांना व आम्हालाही समजले नाही. मात्र, ठोमसे गावाचा रस्ता, सार्वजनिक विहीर व स्मशानभूमी बुडीत क्षेत्रात जात आहे त्यावरही पहिल्यांदा उपाययोजना होणे गरजेचे आहे.- बजरंग माने, माजी ग्रामपंचायत सदस्य२००७ मध्ये फक्त धरणास मंजुरी मिळून जमिनीचे अधिग्रहण न करता धरण क्षेत्रात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना संबंधित ठेकेदारांनी पैसे मिळणार असल्याची भूलथाप मारून काम सुरू केले. फक्त तुटपुंजे भुईभाडे प्रकल्पग्रस्तांना मिळाले आहेत. मात्र, आश्वासन दिलेला मोबदला न मिळाल्यामुळे सर्व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. व आज ही काम बंद अवस्थेत आहे. - रमेश मोरे, प्रकल्पग्रस्तगावात ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होत असल्याने ग्रामपंचायतीच्या वतीने गेल्यावर्षी पाटण तहसीलदारांना बंधाऱ्यांच्या भिंतीजवळ नदीपात्रात तात्पुरती सिमेंट भिंत बांधण्यासाठी निवेदन दिले होते. यामुळे गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असता मात्र, संबंधितांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. चालू वर्षीही ठोमसे गावात टंचाई भासण्याची शक्यता आहे. - कमल कदम, सरपंच, ठोमसे, ता. पाटण