सातारा : जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टर भगवान पितळे यांना धक्काबुक्की करून रुग्णालयातील दरवाजाची काच फोडल्याप्रकरणी शहर पोलिसांनी सहाजणांवर गुन्हा दाखल केला.
विशाल भिसे, विक्रम साठे, गणेश देवकुळे, विशाल मोहिते (रा. सदर बझार सातारा) यांच्यासह सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर बझारमध्ये वडापावचे पैसे देण्याघेण्यावरून बुधवारी रात्री साडेनऊ वाजता दोन गटांत तुंबळ मारामारी झाली होती. यामध्ये मौलाली डोंगरे, प्रकाश कांबळे हे दोघे जखमी झाले होते. त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी तेथे डॉ. भगवान पितळे हे या दोघांवर उपचार करत असताना वरील संशयित तेथे आले.
जखमींवर उपचार करू नये म्हणून डॉ. पितळे यांना शिवीगाळ करून त्यांना धक्काबुक्कीही केली. ह्यतुम्ही बाहेर आल्यानंतर तुम्हला बघतो,ह्ण अशी धमकीही त्यांनी डॉ. पितळे यांना दिली.दरम्यान, या प्रकारानंतर सिव्हिलमधील डॉक्टरांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत संबंधितांविरोधात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी सहाजणांवर रुग्णालयाची तोडफोड करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा केला. यापैकी गणेश देवकुळे याला अटक करण्यात आली आहे.