शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

अवघी म्हसवडनगरी गुलालात न्हाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 11:50 PM

म्हसवड : ‘सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषात लाखो भाविकांच्या उपस्थितीत म्हसवड येथील श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांच्या रथावर गुलाल, ...

म्हसवड : ‘सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषात लाखो भाविकांच्या उपस्थितीत म्हसवड येथील श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांच्या रथावर गुलाल, खोबऱ्यांची उधळण करीत रथोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी लाखो भाविकांनी गर्दी केली होती.महाराष्ट्रसह आंध्रप्रदेश व कर्नाटक राज्यांतील भाविकांचे श्रद्धास्थान असणाºया म्हसवड, ता. माण येथील श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांच्या उत्सवमूर्ती सालकरी सुनील कीर्तने यांच्या घरून वाजत-गाजत रथामध्ये बसवण्यात आल्या. रथामध्ये उत्सवमूर्ती बसवल्यानंतर श्रींच्या मूर्तीच्या रथातून मिरवणुकीस प्रारंभ झाला. रथावर बसण्याचा मान राजेमाने घराण्याचा असून, अजितराव राजेमाने, बाळासाहेब राजेमाने, पृथ्वीराज राजेमाने, सयाजी राजेमाने, विजयसिंह राजेमाने, गणपतराव राजेमाने, शिवराज राजेमाने, तेजसिंह राजेमाने, दीपसिंह राजेमाने, विश्वजित राजेमाने, सयाजीराजे राजेमाने तसेच बाळासाहेब माने, माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख, पोलीस उपविभागीय अधिकारी बी. बी. महामुनी, प्रांत अश्विनी जिरंगे, तहसीलदार बाई माने, तहसीलदार अर्चना पाटील, मुख्याधिकारी चेतना केरुरे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश वाघमोडे यांच्या उपस्थित रथोत्सवास प्रारंभ झाला.श्रींचा विवाह सोहळा एक महिनाभर चालतो. दिवाळी पाडव्यादिवशी घटस्थापना व हळदी समारंभाने या विवाह सोहळ्यास प्रारंभ झाला. त्यानंतर तुळशीविवाह, श्री सिद्धनाथांचा व माता जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा होऊन बुधवारी लग्नानंतरची वरात म्हणजेच रथोत्सव झाला.रथ नगरप्रदक्षिणेस सुरुवात झाली. यावेळी भक्तांनी निशाणे, नारळाची तोरणे, पैशांच्या नोटांची तोरणे श्रींना अर्पण केली. अवघी म्हसवडनगरी गुलालात न्हाऊन गेली होती. रथ नवीन नगरपालिका, महात्मा फुले चौक व तसेच पुढे बसस्थानक चौकातून सातारा-पंढरपूर रस्त्यावर ओढत आणला. तेथून पुढे श्री सिद्धनाथ यांच्या बहिणीस मानकऱ्यांच्या हस्ते साडी-चोळी यांचा आहेर करण्यात आला.म्हसवडचे नगराध्यक्ष तुषार वीरकर, उपनागराध्यक्षा स्नेहल युवराज सूर्यवंशी, माजी नगराध्यक्ष विलासराव माने, विजय सिन्हा, विजय धट, नितीन दोशी, सुरेश म्हेत्रे, भगवान पिसे, आप्पा पुकळे, सर्जेराव माने, युवराज सूर्यवंशी, बबनदादा वीरकर, दत्तोपंत भागवत, प्रा. विश्वंभर बाबर, अ‍ॅड. निस्सार काझी, अ‍ॅड. नानासो कलढोणे, राजू माने, बाबासाहेब माने आदींनी रथावर गुलाल, खोबºयांची उधळण केली.यात्रेनिमित्त मंदिरात श्रींच्या दर्शनासाठी भाविकांच्या पहाटेपासूनच दर्शनबारीत भाविकांच्या रांगा लागलेल्या होत्या. यात्रेनिमित्त पाळणे, मौतका कुँवा, नाना-नानी पार्क आदी खेळांच्या साधनाकडे बालगोपाांची मोठी गर्दी होती. विविध मिठाई विक्रते, खेळणी व इतर साहित्य विक्रेत्यांचीही दुकाने भाविकांच्या गर्दीने फुलून गेली होती.