शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
2
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
3
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
4
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
5
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
6
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
7
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
8
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
9
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
10
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
11
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
12
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
13
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
14
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
16
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
17
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
18
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
19
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
20
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके

..म्हणून भावानेच केला बहिणीचा गळा आवळून खून, शिरवळ पोलिसांनी आवळल्या संशयिताच्या मुसक्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 7:00 PM

शिरवळ पोलिसांनी मोठ्या शिताफीने दहा दिवसांमध्ये हा प्रकार उघडकीस आणला

शिरवळ : गावातील युवकाबरोबर प्रेमसंबंध असल्याच्या कारणातून गावात संबंधिताने अश्लील कृत्य सोशल मीडियावर प्रसारित केल्याने गावात बदनामी होत होती, या कारणातून सख्ख्या भावाने १९ वर्षीय बहिणीचा गळा आवळला. गावाला जात असल्याचा बहाणा करीत बहिणीच्याच स्कार्फने गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार शिरवळ पोलिसांनी उघडकीस आणला. या प्रकरणी शंकर जिमदार महतो (वय २४, मूळ रा.माझीनियापत्ती, ता.माझीसारन, जि.छपरा बिहार सध्या रा.पळशी, ता.खंडाळा) याला अटक केली आहे.शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, खंडाळा तालुक्यातील गुठाळे येथे खळवी नावाच्या शिवारातील गट नंबर २३७ मध्ये लिंबाच्या झाडाखाली शनिवार, दि. १६ रोजी एका १९ वर्षीय परप्रांतीय युवतीचा सडलेल्या अवस्थेतील कवटी, विखुरलेले हाडाचे अवशेष, मळकट कपडे, खासगी कंपनीचा गणवेश आढळून आले होते. त्यावरून संबंधित अवशेष मनिषाकुमारी जिमदार महतो (१९, मूळ रा.माझीनियापत्ती ता.माझीसारन जि.छपरा. सध्या रा.शिर्के काॅलनी, शिरवळ ता.खंडाळा) हिचा असल्याचे शेतामधील मानवी कवटी, विखुरलेले हाडांचे अवशेष, कपडे, चप्पल, जागोजागी विखुरलेले केस, कपडे भरलेल्या बॅगा यावरून स्पष्ट झाले होते.

स्वप्निल महांगरे याने दिलेल्या फिर्यादीवरून शिरवळ पोलिस ठाण्यात आकस्मिक मयत म्हणून नोंद करण्यात आली. घटनास्थळाच्या परिस्थितीवरून संबंधित युवतीचा घातपात असण्याची शक्यता गृहित धरून पोलिस निरीक्षक नवनाथ मदने यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरीक्षक चिमणाजी केंद्रे, शिरवळ पोलिसांच्या पथकाने तपास करीत गोपनीय, तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शुक्रवार, दि. २१ रोजी छठपूजेच्या दुसऱ्या दिवशी मृत मनिषाकुमारी महतो हिच्याबरोबर असलेला जेसीबी चालक सख्खा भाऊ शंकर जिमदार महतो याने बहिणीच्याच स्कार्फने गळा आवळून खून केल्याचे तपासाअंती स्पष्ट झाले.शंकर महतो याला अटक करीत खंडाळा येथील न्यायालयासमोर उभे केले असता, न्यायालयाने शुक्रवार, दि. २९ पर्यंत चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेची फिर्याद पोलिस उपनिरीक्षक शंकर पांगारे यांनी दिली आहे. सहायक पोलिस निरीक्षक चिमणाजी केंद्रे तपास करीत आहेत.

खुनानंतर घातले श्राद्धगुठाळे येथे सख्ख्या भावाने बहिणीचा गळा आवळून खून केल्यानंतर, नित्यनेमाने कामावर जाणाऱ्या शंकर महतो याने शिरवळ येथील रामेश्वर मंदिरालगत असणाऱ्या नीरा नदीपात्रात श्राद्ध घातले होते. काहीच न झाल्याच्या आविर्भावात परिसरात वावरत असताना शिरवळ पोलिसांनी त्याला अटक केली.

बेपत्ताची नोंद कुटुंबीयांकडून नाहीगुठाळे येथे अवशेष आढळल्यानंतर अनेक कारणे या घटनांमधून उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. संबंधित युवती २१ नोव्हेंबरपासून बेपत्ता असतानाही कुटुंबीयांकडून शिरवळ पोलिस स्टेशनला नोंद न करण्यात आल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. त्यानुसार, पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस