शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास-इस्रायल युद्धात गाझाच्या ७० टक्के महिला, मुलांचा बळी गेला; युएनच्या अहवालामुळे खळबळ
2
अजितदादांनीही राजकारणातून निवृत्तीची वेळ घोषित केली; म्हणाले, तोवर हाच पठ्ठ्या काम करणार
3
१५०० रुपये घेणारी लाडकी बहीण काँग्रेसच्या रॅलीत दिसली...; धनंजय महाडिकांचे धक्कादायक वक्तव्य
4
सुप्रिया सुळेंच्या सभेला तब्बल चार तास उशीर, अर्धा हॉल झाला खाली 
5
PM मोदींनी नारायण राणेंना मंत्रिमंडळातून का वगळलं? पत्राचा उल्लेख करत विनायक राऊतांचा मोठा दावा
6
"जातवार जनगणना विधेयक मंजूर करणार, आरक्षणाची 50% ची मर्यादा तोडणार", राहुल गांधींचं PM मोदींना चॅलेन्ज
7
मोठा ट्विस्ट! देवेंद्र फडणवीस यांनी घेतली विनोद पाटील यांची भेट; चर्चांना उधाण
8
एक बातमी अन् शेअर बनला रॉकेट; खरेदीसाठी लोकांची झुंबड, 2 दिवसात 44% ची तेजी
9
“मराठा समाजाला त्रास दिला, आता नक्की पडणार, भाजपाचे...”; मनोज जरांगेंनी थेट आकडाच सांगितला
10
सत्ता डोक्यात गेलेल्यांचा पराभव करून परळीतील गुंडगिरी संपवा; शरद पवारांचा हल्लाबोल
11
ना सेक्स, ना डेटिंग! डोनाल्ड ट्रम्प जिंकताच हजारो महिलांनी विरोधात उघडली कोरियाई मोहिम 
12
महाराष्ट्रात ₹3000, झारखंडमध्ये किती? राहुल गांधींनी महिलांना दिलं मोठं निवडणूक आश्वासन!
13
मुस्लिम संघटनेच्या १७ मागण्या मान्य केल्याचे पत्र 'खोटं'; शरद पवार गटाचा खुलासा
14
आयसीसीला कळविले! टीम इंडिया चॅम्पिअन ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाणार नाही; पाकिस्तानींची जिरवली
15
“UPAने मनरेगा-अन्नसुरक्षा-RTI दिले, गॅरंटीची अंमलबजावणी केली, भाजपाने काय केले?”: खरगे
16
वेगळे पुस्तक छापून काँग्रसने संविधानाची थट्टा उडवली; नरेंद्र मोदींची घणाघाती टीका
17
Kangana Ranaut वर कोसळला दुःखाचा डोंगर, आजीचं निधन, शेअर केली भावुक पोस्ट
18
"पृथ्वीवर यांच्यासारखा पक्ष नसेल"; जयंत पाटलांच्या टीकेवर तटकरे म्हणाले, "तुमचा करेक्ट कार्यक्रम..."
19
Arvind Kejriwal : "आम्ही जे आश्वासन दिलं, ते पूर्ण केलं, पंजाबमध्ये लाच..."; अरविंद केजरीवालांनी विरोधकांना घेरलं
20
दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी, काय चाललेय? यांना महाशक्तीच पर्याय; संभाजी राजेंची टीका

..तर लोकसभा सभापती निवडणुकीत आम्हालाही उमेदवार उभा करावा लागेल - पृथ्वीराज चव्हाण 

By प्रमोद सुकरे | Published: June 17, 2024 4:00 PM

साताऱ्यातील पराभवाचे चिंतन सुरू

कराड : लोकसभा सभापती निवडताना सत्ताधार्यांनी इंडिया आघाडीतील घटक पक्षांशी चर्चा करून ठरवला  तर आमच्याकडून त्याला पाठिंबा दिला जाईल. आपल्याकडे तशी लोकशाहीत परंपरा चालत आली आहे. पण त्यांनी रेटून काही केले तर आम्हालाही उमेदवार उभा करावा लागेल असे मत काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री ,आमदार  पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. कराड येथे सोमवारी बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर लोकनेते विलासराव पाटील यांच्या नावाच्या स्वागत कमानिचे उद्घाटन चव्हाण यांचे हस्ते झाले. त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण माध्यमांशी बोलत होते. यावेळी रयत सहकारी साखर कारखानाचे अध्यक्ष अँड.उदयसिंह पाटील उपस्थित.नेरेटीव्ह सेट करण्यासाठी एन जी ओ चा वापर केला असा सत्ताधारी विरोधकांवर आरोप करीत आहेत. याबाबत छेडले असता चव्हाण म्हणाले, आम्ही एनजीओ चा वापर लोकशाही वाचवण्यासाठी केला आहे. त्या एनजीओंचे आम्ही आभार मानतो. पण सत्ताधाऱ्यांना त्यात अर्बन नक्षलवादी घुसले असे वाटत असेल तर दोन्ही ठिकाणी तुमचे सरकार आहे तुम्ही त्याची चौकशी करावी असेही ते म्हणाले.जिकडे जिंकले तिकडे ईव्हीएम चांगले; हरले तिथे सेट झाले म्हणायचे.मग राहुल गांधी निवडून आले आहेत तेथे अविश्वास का दाखवत नाही.असे एकनाथ शिंदे म्हटले आहेत. याबाबत विचारले असता पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ईव्हीएम खराब आहे असा आरोप आम्ही केलेला नाही. पण दक्षिण मुंबईत काहीतरी घडल्याशिवाय गुन्हा दाखल केला आहे का? मग दाखल केलेल्या एफ आर आय ची कॉपी आम्हाला का दिली जात नाही हे शिंदेंनी सांगावे.राज्यात ओबीसी नेत्यांचे उपोषण सुरू आहे. ५७ लाख बोगस कुणबी नोंदणी रद्द करा. सगे सोयरेंना त्यात घेण्याचा जीआर काढू नका. अशा त्यांच्या मागण्या आहे. शिवाय विधानसभा निवडणुकीला २८८जागा लढण्याचा ठराव त्यांनी त्यांच्या बैठकित केला आहे.याकडे लक्ष वेधले असता पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, खरंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांचे उपोषण सोडताना नक्की काय आश्वासन दिले होते ते अगोदर  जाहीर करावे. कारण मराठा समाजाची फसवणूक केल्याचा काय परिणाम घडला आहे ते आपण पाहातो आहोत.

साताऱ्यातील पराभवाचे चिंतन सुरूसातारा लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीचा झालेला पराभव आमच्यासाठी धक्कादायक आहे. आम्ही का कमी पडलो याचे चिंतन करीत आहे.कराड तालुक्यात तर आम्ही प्रत्येक पंचायत समिती गणाचा याबाबत आढावा घेत आहोत असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरlok sabhaलोकसभाPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणBJPभाजपाcongressकाँग्रेस