‘लोकमत’च्यावतीने ‘रक्ताचं नातं’ ही भव्य रक्तदान मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेद्वारे रक्ताची गरज भागविण्याचे कार्य ‘लोकमत’द्वारे केले जाणार आहे. कालवडे येथे या मोहिमेअंतर्गत रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिराचे उद्घाटन सरपंच सुदाम मोटे, उपसरपंच शुभमराजे थोरात, ग्रामपंचायत सदस्य बालिश थोरात, गीतांजली थोरात यांच्यासह मार्गदर्शक पै. दादासाहेब थोरात, शिवाजीराव थोरात, मनोहरसिंह थोरात, बाबूराव मोटे, शिवाजी थोरात, पै. धनाजी थोरात, भिकू थोरात, गणेश थोरात, मनोहर थोरात, रवींद्र थोरात यांच्या उपस्थितीत झाले.
कालवडेतील ग्रामस्थांनी या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सामाजिक बांधीलकी जपत त्यांनी ‘लोकमत’च्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून हे शिबिर घेण्यात आले.
- चौकट
शिबिरातील रक्तदाते
- बी पॉझिटिव्ह
गीतांजली थोरात, बालिश थोरात, प्रथमेश पाहुणे, अनिकेत थोरात, प्रतीक नवाळे, कृष्णात मोटे, अनिकेत काळे
- ओ पॉझिटिव्ह
रामराव लाटे, श्रेयस थीटे, अक्षय थोरात, अमित माने, स्वराली ढापरे, भाग्यश्री रावते, ऐश्वर्या एकांडे, यश अडसुळे, हेमंत पाटील.
- ए पॉझिटिव्ह
रणजितसिंह थोरात, सुदाम मोटे, अजिंक्य थोरात, सौरभ थोरात, महेश थोरात, विनायक येडगे, प्रदीप टोमके, शुभम तडके.
- ओ निगेटिव्ह
दिगंबर थोरात
- एबी पॉझिटिव्ह
संग्राम पाटील, रणबीर थोरात, अंकिता पाटील, महेश तडके
फोटो : १३केआरडी०३
कॅप्शन : कालवडे, ता. कऱ्हाड येथे आयोजित रक्तदान शिबिराचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाले.