प्रगती जाधव-पाटील ।सातारा : स्पर्धात्मक परीक्षांचा पाया म्हणून गनण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी शिक्षणाधिकाºयांनी पालकांना सोशल मीडियाद्वारे आॅनलाईन साद घातली आहे. यासाठी त्यांनी स्वत:च व्हिडिओ तयार करून तो अपलोड केला आहे.
पूर्व उच्च माध्यमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा राज्यभरात १७ फेब्रुवारी २०१९ रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी सद्य:स्थितीत मागील वर्षीच्या तुलनेने कमी संख्येने विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे.
या पार्श्वभूमीवर शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी साताºयाचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी तथा राज्य परीक्षा परिषदेचे माजी सहायक आयुक्त राजेश क्षीरसागर यांनी राज्यातील सर्व शाळा व पालकांना या परीक्षांसाठी अधिकाधिक अर्जांची नोंदणी करण्याचे आवाहन सोशल मीडियाद्वारे केले आहे. त्यासाठी त्यांनी स्वत:चा सहा मिनिटांचाव्हिडिओ तयार केला आहे.त्याद्वारे त्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेची माहिती, अंतिम तारीख याबरोबरच परीक्षेची उपयुक्ततता याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले आहे.शैक्षणिक अभ्यासक्रमाकडे पालकांचे लक्षशिष्यवृत्ती परीक्षांना बसण्याचे राज्यातील विद्यार्थ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. यामागे पालकांची उदासिनता, परीक्षा मार्गदर्शन वर्गाची अनुपलब्धता, अन्य स्पर्धा परीक्षांची रेलचेल, अवघड प्रश्नसंच, उत्तर पत्रिकांची कडक तपासणी आणि शिष्यवृत्ती म्हणून मिळणारी कमी रक्कम आदी कारणे आहेत. राज्यात २०१५ पर्यंत चौथी आणि सातवीचे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी बसत होते. शासन निर्णयानुसार पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती निर्धारित केल्यानंतर वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेत बसविण्यापेक्षा शैक्षणिक अभ्यासक्रमाकडे लक्ष देण्याकडे पालकांचा असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
गेल्या काही वर्षांत शिष्यवृत्तीविषयी सर्वसामान्य पालकांमध्ये जनजागृतीचा अभाव जाणवत आहे. आॅनलाईन प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांना शाळेतूनच परीक्षेसाठी अर्ज करणं शक्य होत आहे. त्यामुळे यंदा विविध समाज माध्यमांची मदत घेऊन विद्यार्थ्यांचा टक्का वाढविण्याचा प्रयत्न करणार आहे. यासाठी साताºयातून राबविलेला उपक्रम आदर्शवत आहे.- दत्तात्रय जगताप, अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे