सातारा : ‘समाजवादी विचारसरणीत अनेक लोक घडले असून, आज जागतिकीकरणाच्या वादळामुळे समाजवादी विचारसरणी भारतात मागे पडत आहे,’ असे मत ज्येष्ठ समाजवादी विचारवंत आणि माजी गृहराज्यमंत्री महाराष्ट्र राज्य पुण्यभूषण भाई वैद्य यांनी दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सातारा आयोजित ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते अनंत शिकारखाने आणि साताऱ्याच्या हृदयआठवणी पुष्प तिसरे या कार्यक्रमात व्यक्त केले.या कार्यक्रमास प्रा. रमणलाल शहा, कवी उद्धव कानडे, प्रा. पुरुषोत्तम शेठ, संस्थापक अध्यक्ष शिरीष चिटणीस, सुरेश शिकारखाने, व्यवस्थापक विनायक भोसले आदी उपस्थित होते.भाई वैद्य म्हणाले, ‘दिवंगत अनंत शिकारखाने हे हरळीच्या मुळीचे कार्यकर्ते असून, ते समाजवादी पक्षाचे जिद्दीचे कार्यकर्ते होते. त्यांचे त्या काळातील मोती चौकातील दुकान म्हणजे राजकीय वैचारिक कट्टा होता. ते शेवटपर्यंत एस. एम. जोशींबरोबर समाजवादी पक्षात राहिले. १९४६ मध्ये जेव्हा मी साताऱ्यामध्ये आलो त्यावेळेस राष्ट्र सेवादलाचा बारा हजारचा ताफा कॉ. शहनवाज खान यांच्या अखत्यारित होता. यावेळी माझे डॉ. कटारिया, भाऊसाहेब, दाभोलकर, डॉ. खुटाळे, कॉ. किरण माने, प्रा. पुरुषोत्तम शेठ, प्रा. आ. ह. साळुंखे हे मित्र होते. जागतिकीकरणामुळे आज प्रचंड विषमता व बेरोजगारी वाढत चालली असून, जागतिकीकरण हे अहितकारी आहे. त्यामुळे शेतकरी प्रचंड आत्महत्या करीत असून, हे जागतिकीकरणाचेच देणे आहे.’प्रा. रमणलाल यांनी यावेळी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात दिनकर झिंबरे, मधुसुदन पत्की, आप्पासो शालगर, लालाशेठ बागवान, सुनील बल्लाळ, शिवाजी हंबीरे, भुजबळ, शिल्पा चिटणीस, ज्योती नलवडे, बाबर, प्रदीप लोहार, उदय जाधव, बाळकृष्ण इंगळे, सतीश पवार, हणमंत खुडे, बागल, रवींद्र कळसकर, यशवंत शिलवंत, सुनील बंबाडे, आग्नेश शिंदे, प्रशांत चोरगे, लक्ष्मण कदम, सागर पोगाडे आदी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे शिरीष चिटणीस यांनी प्रास्ताविक केले. गुलाब पठाण यांनी सूत्रसंचालन केले. सुरेश शिकारखाने यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
समाजवादी विचारसरणी भारतात मागे पडत चाललीय
By admin | Published: November 05, 2016 11:12 PM