पुसेगाव : अयोध्या येथे नव्याने बांधण्यात येणाऱ्या राम मंदिराच्या पायाभरणीसाठी खटाव तालुक्यातील वर्धनगड येथील हुतात्मा स्मारक आवारातील पवित्र माती आयोध्येला रवाना करण्यात आली.
आमदार गोपीचंद पडळकर, आमदार जयकुमार गोरे, आमदार महेश शिंदे यांच्याहस्ते या मातीचे वर्धनगड येथे विधिवत पूजन करून अखिल भारतीय बेरड, रामोशी समाज कृती समितीचे मार्गदर्शक आप्पासाहेब चव्हाण यांच्याकडे ही माती सुपूर्त करण्यात आली.
सातारा जिल्हा हा शूरवीर, स्वातंत्र्यवीर व सैनिकांचा जिल्हा आहे. जिल्ह्यातील मृदा कलश यात्रेची सुरुवात वर्धनगड या ठिकाणाहून झाली आहे. देशातून विविध ठिकाणाहून माती, कलशयात्रेच्या माध्यमातून गोळा झालेले पवित्र जल, पवित्र मातीची एतिहासिक नोंद रामजन्मभूमी मंदिर विश्वस्त मंडळ यांच्याकडे संग्रहित ठेवली जाईल, अशी माहिती रामोशी बेडर कृती समितीचे अध्यक्ष मोहनराव मदने यांनी दिली.
या माती कल यात्रेत आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक मातीकलश यात्रा महाराष्ट्र राज्य प्रमुख अजय मदने, कृष्णात मदने, अभिजित मदने, नरवीर उमाजी नाईक मित्र मंडळातील सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
छायाचित्र ३१पुसेगाव
वर्धनगड येथे माती कलशाचे पूजन करण्यात आले. यावेळी आमदार महेश शिंदे, मोहन मदने, आप्पासाहेब चव्हाण, प्रियाताई नाईक, प्रल्हाद चव्हाण उपस्थित होते.