मलकापूर, 11 : सध्यस्थितीची गरज ओळखून पर्यावरण समतोल राखण्यासाठी येणाºया दिवाळीत फटाके न वाजविण्याची ४ हजार ४३८ विद्यार्थ्यांसह १७० शिक्षकांनी शपथ घेतली. बाहेरील खाद्यपदार्थांचा वापर टाळून प्रदूषण मुक्त व निरोगी दिवाळी साजरी करण्याचा संकल्प केला.
येथील मळाईदेवी शिक्षण संस्थेकडून अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवत समाजप्रबोधन केले जाते. संस्थेच्या विविध शाखांमधे ४ हजार ४३८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर सर्व शाखांमधे १७० शिक्षक ज्ञानदानाचे काम करीत आहेत. मंगळवार, दि. १० रोजी सर्व शाखांमध्ये एकाचवेळी फटाकेविरहीत व प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याची सामुदायिक शपथ घेण्यात आली.
फटाके वाजविल्यामुळे गंभीर आजार होतात. सर्वत्र कचºयाचे साम्राज्य निर्माण होते. अशा अनेक विघातक दुष्परिणामाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. तसेच दिवाळीसाठी बाहेरून खाद्यपदार्थ न आणता घरात बनविलेला फराळ करून आपणच आपल्या आरोग्याची काळजी घेऊ या, असा संकल्पही यावेळी करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेचे सचिव अशोकराव थोरात म्हणाले, दिवसेंदिवस प्रदूषणामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. फटाके वाजविल्यामुळे दिवाळीतच सर्वात जास्त प्रदूषण होते. हे टाळण्यासाठी समाजातील समाजकार्य करणाºया विविध संस्था व सर्व शिक्षण संस्थांनी समाजप्रबोधन करणे गरजेचे आहे. सर्वांनीच प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी प्रसार आणि प्रचार करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. शरद तांबवेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले. एस. बी. शिर्के यांनी प्रास्ताविक केले. तर आर. आर. पाटील यांनी आभार मानले.दहा हजार पत्रकांचे वाटपमळाईदेवी शिक्षण संस्थेने प्रदूषण मुक्त दिवाळी का साजरी करावी? याबाबतचे एक पत्रक छापले आहे. हे प्रबोधन स्वत:च्या संस्थेपुरते मर्यादित न ठेवता त्याला व्यापक स्वरूप देण्यात आले आहे. अशी १० हजार पत्रके छापून तालुक्यातील विविध शाळांमध्ये वाटली आहेत. त्यामुळे खºया अर्थाने प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी समाजप्रबोधन करण्याचा प्रयत्न केला आहे.