सातारा : जिल्हा पोलीस दलाअंतर्गत पोलीस कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीच्या झालेल्या कार्यक्रमात पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी एक गाणे गायले. थेट एसपींनीच गाणे गाण्यास सुरुवात केल्यामुळे उपस्थित पोलीस अवाक् झाले.पोलीस दलात सुमारे १२ वर्षे काम केल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांची पोलीस शिपाईवरुन पोलीस नाईक पदावर पदोन्नती करण्यात येते. या पदोन्नतीचा कार्यक्रम रविवारी पोलीस करमणूक केंद्रामध्ये आयोजित करण्यात आला होता.
पदोन्नतीचा कार्यक्रम झाल्यानंतर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी उपस्थित पोलिसांना प्रत्येकातील जे टॅलेंट आहे ते सादर करण्यास सांगितले. पोलिसांनीही त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेकांनी गाणी, विनोद, वेगवेगळे आवाज सादर करत अक्षरश: धम्माल उडवून दिली.
प्रत्येकजण आपली कलाकारी सादरीकरण करत असतानाच पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनीही एखादी कलाकारी सादर करावी, अशी मागणी झाली. यानंतर अधीक्षक सातपुते यांनीही या कार्यक्रमात थेट सहभाग घेत एक गीत गाणार असल्याचे सांगितले. अधीक्षक सातपुते यांनी प्राण जाए वचन न जाए या चित्रपटातील गाणे गायले. तब्बल चार मिनिटे तोंडपाठ गाणे गायल्यानंतर पोलिसांनी त्यांना भरभरुन दाद दिली.
पोलीस अधीक्षकांनी गायले गाणेलोकमत न्यूज नेटवर्कसातारा : जिल्हा पोलीस दलाअंतर्गत पोलीस कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीच्या झालेल्या कार्यक्रमात पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी एक गाणे गायले. थेट एसपींनीच गाणे गाण्यास सुरुवात केल्यामुळे उपस्थित पोलीस अवाक् झाले.पोलीस दलात सुमारे १२ वर्षे काम केल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांची पोलीस शिपाईवरुन पोलीस नाईक पदावर पदोन्नती करण्यात येते. या पदोन्नतीचा कार्यक्रम रविवारी पोलीस करमणूक केंद्रामध्ये आयोजित करण्यात आला होता. पदोन्नतीचा कार्यक्रम झाल्यानंतर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी उपस्थित पोलिसांना प्रत्येकातील जे टॅलेंट आहे ते सादर करण्यास सांगितले. पोलिसांनीही त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेकांनी गाणी, विनोद, वेगवेगळे आवाज सादर करत अक्षरश: धम्माल उडवून दिली.प्रत्येकजण आपली कलाकारी सादरीकरण करत असतानाच पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनीही एखादी कलाकारी सादर करावी, अशी मागणी झाली. यानंतर अधीक्षक सातपुते यांनीही या कार्यक्रमात थेट सहभाग घेत एक गीत गाणार असल्याचे सांगितले.अधीक्षक सातपुते यांनी प्राण जाए वचन न जाए या चित्रपटातील गाणे गायले. तब्बल चार मिनिटे तोंडपाठ गाणे गायल्यानंतर पोलिसांनी त्यांना भरभरुन दाद दिली.