सातारा : शेतकºयांना शेतातील विविध प्रयोग करण्यासाठी राधिका रस्त्यावर प्रतापसिंह शेती फार्मची निर्मिती करण्यात आली होती. गेल्या काही दिवसांत येथे तळीरामांचा वावर वाढला आहे. दिवसाढवळ्या या फार्ममध्ये चकण्यासह तळीराम ठाण मांडून बसत असल्याचे धक्कादायक चित्र पाहायला मिळते.
येथील राधिका रोड मार्गावर जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असणाºया आणि काही एकरांत विस्तारलेल्या प्रतापसिंह शेती फार्ममध्ये शासनाच्या विविध योजनांतर्गत शेतीतील विविध प्रयोग केले जातात. सक्रियपणे येथे गांडूळ खतनिर्मिती प्रकल्प, शेळीपालन प्रकल्प आदी प्रकल्प येथे सुरू आहेत. मात्र, पूर्वीइतका सामान्यांचा राबता या फार्मकडे दिसत नाही.त्याचे कारणही तसेच आहे. दुपारी एकनंतर या परिसरात मद्यपींचा अड्डा जमतो. तीन-चारजणांचे टोळके गाड्यांवरून बाटल्या घेऊनच फार्ममध्ये एन्ट्री करते. त्यानंतर झाडाच्या सावलीखाली त्यांचा डाव रंगतो. कागदातून बांधून आणलेला चकणा खात-खात, एक-एक घोट थेट बाटलीनेच मद्यप्राशन सुरू असते. मोठ्या आवाजातील गप्पा आणि सोबतीला उडत्या चालीची गाणी यामुळे त्यांना बारमध्येच बसल्याचा जणू आनंद मिळतो. सुमारे दोन ते अडीच तास येथे रंगीत संगीत पार्टी केल्यानंतर सर्व वस्तू तिथेच सोडून हे टोळकं गाड्या सुसाट वेगाने फार्मच्या बाहेर काढतात.
शेतीफार्ममध्ये काही कामानिमित्ताने येणाºयांना हा नजारा आता नित्याचाच बनला आहे. हे टोळकं कोणाच्या परवानगीने फार्ममध्ये येतं, येथे कोणत्या अधिकाराने पार्टी रंगवतं याविषयी कोणालाच काहीच माहिती नाही; पण त्यांचा थाट आणि रुबाब पाहून ते कोणाच्यातरी वशिल्यानेच येथे येत असावेत, अशी माहिती येथील एका कर्मचाºयाने नाव न सांगण्याच्या अटीवर ‘लोकमत’ ला सांगितले.शासकीय जागेचा होतोय गैरवापरप्रतापसिंह शेती फार्ममध्ये शेतीशी निगडित विविध प्रयोग केले जातात. येथे सुरू असलेला गांडूळ खत प्रकल्प पाहण्यासाठी शालेय आणि महाविद्यालयीन मुलं येतात. काही शाळा तर येथे शैक्षणिक सहलही काढतात. नेमकं या सहली येथे आल्यानंतर येथे आलेल्या मुला-मुलींना हे प्रकार खूपच भयावह वाटतात. शिक्षकही मुलांनो तिकडे बघू नका म्हणून विषय संपवतात; पण येथे बसलेल्या टोळक्याला कोणीही हुसकावत नाही, हे विशेष! शासकीय जागेत बेकायदेशीरपणे घुसून तिथे मद्यप्राशन करणे गुन्हा आहे.; पण या टोळक्याला हटकवणं किंवा त्यांना येथे येण्यापासून मज्जाव करण्याचे धाडस अद्यापपर्यंत कोणीही केल्याचे दिसत नाही. शासकीय जागेचा होणारा गैरवापर थांबविण्याची मागणी होत आहे.सातारा येथील राधिका रोड रस्त्यावरील प्रतापसिंह शेती फार्ममध्ये दुपारच्या सुमारास तळीरामांची बिनदिक्कत अशी ओपन एयर पार्टी सुरू असते.