मल्हारपेठ : सतत पडणाºया पावसामुळे सोयाबीनची उंची खुंटली असून, पाने खाणाºया किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. भुईमूग पिवळा पडला असून, वाढ झालेली नाही. महिनाभरात सूर्याने तोंड न दाखविल्यामुळे पिकांना तापसिक मिळाली नाही. त्याचा परिणाम भांगलण, कोळपणी न झाल्यामुळे तणाचे प्रमाण वाढले आहे. सोयाबीन, भुईमुगासह सर्व प्रकारच्या कडधान्य उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होणार असल्याची भीती पाटण तालुक्यातील शेतकºयांतून व्यक्त होत आहे.
चालू वर्षी पाटण तालुक्यात वळीव पावसाने हुलकावणी दिली. जूनच्या तोंडावर पडलेल्या वळीव पावसावर अनेक शेतकºयांनी अंतर्गत मशागतीची कामे केली. तर अनेकांनी धूळवाफेवर पेरणी केली. जूनच्या पहिल्या पंधरावड्यात उघडझाप करत सुरू झालेल्या पावसावर तालुक्यातील शंभर टक्के पेरण्या पूर्ण झाल्या. दरम्यान पेरणी केलेल्या पिकांची उगवणही समाधानकारक झाली. मात्र, गेल्या एक महिन्यापासून मुसळधार पडत असणाºया पावसामुळे खरीप हंगामातील सर्वच पिकांची उंचीत कमालाची घट झाली आहे. ऊन, पावसाची उघडझाप असली तर पिकांच्या वाढीस पोषक वातावरण असते. मात्र तसे न होता सलग महिनाभर ऐन पिके वाढण्याच्या वेळी पाऊस सतत पडत राहिल्यामुळे पिकांच्या उंचीत मोठी घट झाली आहे.
सतत पडत असलेल्या पावसामुळे कोळपणी, भांगलणीसारखी मशागतीची कामे करता आलेली नाही. त्यामुळे पिकापेक्षा तणांचे प्रमाण अधिक वाढलेले आहे. सोयाबीन, भुईमुगासह सर्व प्रकारच्या कडधान्यांची उंची खुंटली असून, पिके खुराटली आहे. यामुळे उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होणार असल्याचे शेतकरी वर्गातून सांगितले जात आहे. पेरणी होऊन दीड महिना झाला असून, या दिवसात सोयाबीन पिकाची चांगल्या क्षमतेने वाढ होते. मात्र, त्याचेही नुकसान झाले आहे. त्यावर पाने खाणाºया किडींचा प्रादुर्भाव झाला आहे.प्रमाणापेक्षा जास्त पावसाचा सोयाबीनसह ऊस पिकावरही परिणाम जाणवत आहे. ऊसपिकांतही वाढ झालेली नाही. तालुक्यात चालू वर्षी भात पिकांस पोषक वातावरण आहे. सुरुवातीस पेरणी केलेली व नुकतीच रोप भात लागण केलेली भाताची शेते जोमात डुलत आहेत. अशाच प्रकारे पाऊस राहिला तर भात पिकाचे उत्पन्नात वाढ होणार आहे. मात्र, दुसरीकडे खरीप हंगाम वाया जाण्याची भीती शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.इतर पिकांवरही परिणाम...सोयाबीनबरोबरच पाटण तालुक्यातील डोंगराळ भागात भुईमूग पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र चालू वर्षी भुईमुगास जास्त पाऊसकाळ झाल्यामुळे पिवळटपणा आला आहे. त्याप्रमाणे ऊस, कडधान्य पिकांवरही याचा परिणाम झालेला आहे.खरीप हंगाम अडचणीत
खरीप हंगामातील पिके ही तीन ते चार महिन्यांची असतात. पेरणीनंतर आठ-दहा दिवसांत उगवण होते. त्यानंतर महिन्याभरात त्यास खते, कोळपणी व भांगलण दिली जाते. कोळपणीमुळे पिकांच्या बुडक्याला भर लागते. तर भांगलण दिल्यामुळे तण नाहीसे होऊन पीक वाढीस जोर लागतो. मात्र चालू वर्षी कोळपणी व भांगलण न झाल्यामुळे खरीप हंगामही अडचणीत आला आहे.
चालू वर्षी एकसारखा पाऊस पडल्याने पिकांना तापसिक नाही. शेतकºयांना कोळपणी व भांगलण करण्यास संधी मिळाली नाही. अति पावसामुळे पिकांची उंची खुंटते तर भुईमूग पिवळा पडला आहे. अति पावसामुळे उत्पन्नात पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त घट होईल.- शिवाजी शेडगे, शेतकरी, शेडगेवाडी, ता. पाटण