शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
2
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
3
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
4
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
5
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
6
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
7
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
8
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
9
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
10
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
11
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
12
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
13
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
14
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
15
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
16
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
17
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
18
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
19
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
20
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा

सोयाबीनसाठी खर्च २५ हजार, उत्पन्न मिळाले सात हजार; खरीप हंगामात पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 2:09 PM

यावर्षीच्या खरीप हंगामात फायद्याऐवजी तोटाच सहन करावा लागला

शंकर पोळकोपर्डे हवेली : यावर्षीच्या खरीप हंगामात पावसाने शेतकऱ्यांचा सतत वांदा केला. त्यामुळे पीक नुकसानीला सामोरे जावे लागले. कऱ्हाड तालुक्यातील शामगावचे शेतकरी यशवंत चंद्रू पोळ यांना तर एक एकर क्षेत्रातून फक्त १३० किलोच सोयाबीन मिळाले. पैशामध्ये विचार केल्यास सोयाबीनची किंमत ७ हजार होते; पण त्यासाठी २४ हजार ८०० रुपये खर्च झाला आहे. शामगाव येथील यशवंत पोळ हे पाण्याची उपलब्धता बघूनच दोन पिके घेतात. यंदाच्या हंगामात त्यांनी खरिपाचे पीक म्हणून सोयाबीनची एक एकरावर लागवड केली होती. यंदाच्या हंगामात पाऊस उशिरा सुरू झाल्याने जुलैच्या पहिल्या आठवड्यात पेरणी केली. त्यानंतर सोयाबीन पिकाची उगवण चांगली झाली. मात्र, त्यानंतर पुढील १५ दिवसांपासून पावसाची सतंतधार सुरू झाली. तर फुलकळी लागण्याच्या वेळी पाऊसच गायब झाला.नंतरच्या काही दिवसांत पावसाने पुन्हा सुरुवात केली. हा पाऊस काढणीपर्यंत सुरूच होता. त्यामुळे  पिकाचे मोठे नुकसान झाले. पावसाच्या उघडीपीनंतर रानातून सोयाबीन काढून आणले. त्यानंतर मळणी केल्यावर केवळ एक एकर क्षेत्रावर १३० किलोच सोयाबीन झाले. याची किंमत सध्याच्या दराने साडेसहा ते सात हजार होत आहे. पण, या शेतकऱ्याने सोयाबीन घेण्यापासून काढणीपर्यंत २५ हजार रुपये खर्च केला. उत्पादन पाहता हा सर्व खर्च वायाच गेला आहे. खरिपाने दगा दिला, आता रब्बी हंगाम काहीतरी आधार देईल, आशा आशेवर पोळ आहेत.

यावर्षीच्या खरीप हंगामात फायद्याऐवजी तोटाच सहन करावा लागला. त्यातच डोंगरी गाव म्हणून शासनाच्या सुविधाही मिळत नाहीत. जमीन पाडून ठेवायची नाही म्हणून आम्ही शेती करतो; पण यावर्षी सोयाबीन पिकातून घातलेला खर्चही निघालेला नाही.  - यशवंत पोळ, शेतकरी  

 

खर्च असा    नांगरट २५०० रुपये, फणणी १५००, पेरणी १६००, बियाणे २५००, खते १९००, औषधांची फवारणी ५ हजार रुपये, कोळपणी १ हजार, भांगलणी ३ हजार, काढणी ३ हजार , मळणी ३०० आणि मजुरी १ हजार

टॅग्स :Sa Re Ga Ma Pa Showसा रे ग म पSatara areaसातारा परिसरFarmerशेतकरी