सातारा : नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशनमार्फत दिला जाणारा यावर्षीचा "विशेष सामाजिक गौरव" पुरस्कार सातारा पंचायत समितीच्या विद्यमान सभापती सरिता इंदलकर यांना नुकताच जाहीर झाला आहे. दरम्यान, पुरस्काराचे परिपत्रक देऊन आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी त्यांचे कौतुक करून सन्मान केला आहे.
तीन राज्यांचे कार्यक्षेत्र असणाऱ्या नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशनचा देशांतर्गत दिला जाणारा विशेष सामाजिक गौरव पुरस्कार सरिता इंदलकर यांना जाहीर झाल्याने सातारा तालुक्यासह किडगाव गण व कळंबे ग्रामस्थांमध्ये समाधान असून, कौतुक केले जात आहे. शिवारातील बांधावर जाऊन शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ, महिला-युवतींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने केलेले कार्य, अपंग-निराधारांना आवश्यक ती मदत अथवा कोविडच्या कठीण काळात लोकांची केलेली सेवा. अशा अनेक कार्यकर्तुत्वाच्या जोरावर सभापती इंदलकर यांनी कामाचा नवा पायंडा पाडला आहे. सभापतींच्या या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. हा पुरस्कार सोहळा सोमवार दि. ३१ मे २०२१ रोजी बेळगाव येथे होणार असून, या पुरस्कारामध्ये विशेष प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह व म्हैसूर फेटा यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रधान करून सन्मान करण्यात येणार आहे.