शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
2
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
3
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
4
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
5
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
6
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
7
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
8
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
9
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
10
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
11
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
12
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
13
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
14
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
15
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
16
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
17
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
18
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
19
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

तमाशाचा खर्च जलसंधारण कामांसाठी...

By admin | Published: April 10, 2017 9:49 PM

बिचुकले ग्रामस्थांचा निर्णय : लहान ओढे-नाल्यांवर बंधारे बांधणार; यात्रा नियोजनासाठीच्या बैठकीत भूमिका स्पष्ट

वाठार स्टेशन : बिचुकले, ता. कोरेगाव येथे वार्षिक यात्रेत करमणुकीचा कार्यक्रम रद्द करून तो निधी जलसंधारणाच्या कामासाठी खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात्रेच्या नियोजनासाठी आयोजित केलेल्या बैठकीत एकमुखाने घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या पैशांतून लहान ओढे-नाल्यांवर बंधारे बांधण्यात येणार आहेत, अशी माहिती देण्यात आली. बिचुकले येथे ११ व १२ एप्रिलला जानुबाई देवीची यात्रा होणार आहे. या गावात गेल्या चार वर्षांपासून जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्याकरिता शासनाने सर्वतोपरी सहकार्य केले असून, पाणलोट विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून सव्वा कोटींची भरीव कामे झाली आहेत. गावाच्या दक्षिण व पूर्वेस डोंगर असल्याने पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवण्यासाठी गावकऱ्यांनी कंबर कसली आहे. त्यातूनच हा निर्णय घेतला आहे. यामध्ये युवक व महिलांचा लक्षणीय सहभाग आहे. त्यातून सुमारे सहा किलोमीटर लांबीच्या ओढ्यावर साखळी पद्धतीने बंधारे बांधण्यात आलेत. डोंगरात दीड वर्षांपूर्वी लावलेल्या सीताफळाच्या तीनशे झाडांना यंदा फळे लागली आहेत. चिंच व डोंगरी झाडेही बहरली असून सीसीटी, माती व दगडी नालाबांध अशी अनेक कामे मार्गी लागली आहेत. त्याकरिता चार वर्षांत जवळपास तीन कोटी रुपये खर्च झाले आहेत. गावात वर्षभर श्रमदान व वृक्षारोपणाचा जागर सुरू असतो. त्यामुळे गेल्या वर्षी जेमतेम पाऊस पडूनदेखील यंदा पाणीपातळी टिकून असल्याचा प्रत्यय शेतकऱ्यांना आला आहे. यंदाच्या खरीप हंगामापासून उसाऐवजी कमी पाण्यात येणारी पिके घेतली जाणार आहेत. सामूहिक शेती करून भांडवली खर्चावर मात करण्यासाठी शेतकरी एकवटले आहेत. दरम्यान, या गावची वार्षिक यात्रा होत आहे. त्याच्या नियोजनासाठी गावात बैठक झाली. यात्रेत तमाशासाठी लाखाच्या वर खर्च येतो. या पैशाची बचत करून लहान ओढे-नाल्यांवर बंधारे बांधण्याचे या बैठकीत सर्वानुमते ठरवण्यात आले. या कामांतून बिचकुलेकरांचा दुष्काळमुक्तीचा नारा बुलंद होणार आहे. या बैठकीला सरपंच साधना पवार, उपसरपंच अनिल पवार, रमेश पवार, शिवाजी पवार, विलास पवार, विजय पवार, संभाजी पवार, किशोर पवार, अमर पवार, संदीप पवार, मनोज पवार, सतीश पवार व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर) बिचुकले, ता. कोरेगाव येथील ग्रामस्थांनी जलसंधारणाचा निर्णय एकमताने घेतला आहे.