गत अनेक वर्ष संघर्षात असलेले वांग मराठवाडी धरण सध्या अंतिम टप्प्यात असून गत चार वर्षांपासून के. जे. जाधव कंपनीने कामाला गती दिली आहे. सध्या धरणाच्या सांडव्याचे काम गतीने सुरू असून पिचिंगचे काम अंतिम टप्प्यात आहे. धरणास्थळी मोठ्या प्रमाणावर यंत्रसामग्री असून दीडशे कामगार रात्रंदिवस धरणावर कार्यरत आहेत. पाटबंधारे विभाग आणि के. जे. युनिटी कन्स्ट्रक्शन यांच्या माध्यमातून काम गतीने सुरू आहे. बांधकाम विभाग व ठेकेदार कंपनीचे अभियंता धरणाच्या कामावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेन हिरे, उपकार्यकारी अभियंता नईम सुतार, महादेव कारंडे, प्रकल्प व्यवस्थापक संदीप मोरे यांच्या प्रयत्नांमुळे धरणाच्या कामाला गती आली आहे.
ठेकेदार कंपनीने वारंवार धरणाच्या बांधकामासाठी वाळूची मागणी करूनही प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. मात्र, तरीही ठेकेदार कंपनीने दुप्पट किमतीने बाहेरून वाळूची उपलब्धता करून वाळू उपलब्ध करून धरणाचे काम चालू ठेवले. त्यामध्ये कंपनीला मोठ्या प्रमाणावर तोटा सहन करावा लागला. शिवाय धरणग्रस्तांच्या मागण्या पूर्ण झालेल्या नसल्याने धरणग्रस्त काम बंद पाडत आहेत. त्याचा भुर्दंड कंपनीला सोसावा लागत आहे.
- कोट
येत्या वर्षात धरणाचे काम संपविण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने कामाला गती दिली आहे. पाटबंधारे विभागाच्या अधिका-यांंच्या मार्गदर्शनाखाली धरणाचे काम दर्जेदार होत आहे.
- संदीप मोरे
प्रकल्प व्यवस्थापक
फोटो : २५केआरडी०४
कॅप्शन : पाटण तालुक्यातील वांग-मराठवाडी प्रकल्पाच्या कामाला गती आली असून पिचिंगचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. (छाया : बाळासाहेब रोडे)