सातारा : पुणे-बंगलोर महामार्गावरकारसाठी प्रतितास ९० किलोमीटर वेगाची मर्यादा असताना एका कार चालकाने तब्बल १७१ च्या वेगाने कार चालवून नागरिकांच्या काळजाचा थरकाप उडवून दिला. हा सारा प्रकार दोन दिवसांपूर्वी पोलिसांकडे असलेल्या स्पीडगनमध्ये कैद झाला असून, संबंधित चालकाला एक हजार रुपयांचा दंडही आकारण्यात आला आहे.काही महिन्यांपूर्वी महामार्ग पोलिसांना अत्याधुनिक अशा दोन स्पीडगन मशीन देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये भुर्इंज आणि कºहाड टॅबचा समावेश आहे. महामार्गावरून धावणाऱ्या वाहनांचा वेग स्पीडगनद्वारे मोजण्यात येत आहे. भुर्इंज टॅबच्या पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी महामार्गावरील जोशी विहीरजवळ स्पीडगन असलेली कार उभी केली होती. त्यावेळी दुपारच्या सुमारास सातारा बाजूकडून एक भरधाव कार पुण्याच्या दिशेने जात होती.हीच ती कार..महामार्गावरून १७१ च्या वेगाने धावणाºया कारचा एमएच १४ एचडब्यू ७७४९ असा नंबर आहे. महामार्गावर स्पीडची मर्यादा ९० ची असताना ही कार १७१ च्या वेगाने धावली. पोलिसांनी अशा वाहन चालकांवर करडी नजर ठेवली आहे.
पुणे-बंगलोर महामार्गावरून १७१च्या वेगाने धावली कार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 6:17 AM