शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

Satara: भरधाव कार ट्रकखाली घुसली, कोल्हापुरातील एकजण ठार; एअर बॅग उघडूनही मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 1:11 PM

पुणे-बंगळुरू महामार्गावर मलकापूरच्या हद्दीत अपघात

मलकापूर : महामार्गाकडेला उभ्या मालट्रकला भरधाव कारची पाठीमागून धडक होऊन झालेल्या अपघातात कार ट्रकखाली घुसली. या अपघातात कारमधील एकजण जागीच ठार तर एकजण जखमी झाला आहे. पुणे-बंगळुरू महामार्गावर बुधवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर कऱ्हाड-कोल्हापूर लेनवरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती.विष्णू दत्तू सुतार (वय ५५, रा. पिंपळगाव बुद्रूक ता. कागल, जि. कोल्हापूर) असे अपघातात जागीच ठार झालेल्याचे नाव आहे. तर चालक अभिजित शिवाजी मुळे (रा. पिंपळगाव खुर्द ता. कागल जि. कोल्हापूर) असे अपघातात जखमी झालेल्या चालकाचे नाव आहे.मालट्रक (एमएच १३ डी क्यू ९६४६) हा माल भरून कोल्हापूर दिशेला जात होता. पुणे-बंगळूरू महामार्गावर मलकापूर येथे झाडाखालचा वडापाव दुकानासमोर आला असता पंक्चर झाला. चालकाने पंक्चर काढण्यासाठी मालट्रक महामार्गाकडेला उभा केला होता. पंक्चर काढत असताना पाठीमागून मालट्रकला काहीतरी धडकल्याचा आवाज आला. चालकाने पाठीमागे जाऊन बघितले असता, कार (जीए ०५ डी ८५७७) मालट्रकखाली घुसली होती. या अपघातात सुतार याच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते जागीच ठार झाले. मुळे गंभीर जखमी झाले.मुळे आणि त्यांचे कर्मचारी सुतार हे दोघे कामानिमित्त पेण येथे गेले होते. काम आटोपून परत गावी जात असताना कारवरील ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाला, अशी चर्चा अपघातस्थळी होती. अपघात होताच परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेतली. अपघातस्थळी बघ्यांची गर्दी झाल्यामुळे पुणे-कोल्हापूर लेनवरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती.

अपघाताची माहिती महामार्ग देखभाल विभागासह कऱ्हाड पोलिस स्टेशन व महामार्ग पोलिसांना दिली. अपघाताची माहिती मिळताच देखभाल विभागाचे कर्मचारी व पोलिस तातडीने अपघातस्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवून दिले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वेणुताई उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिला. कदम क्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.एअर बॅग उघडून ही आला मृत्यू..मलकापुरात बुधवारी मध्यरात्री झालेल्या अपघातात भरधाव कार मालट्रकला धडकल्यानंतर एअरबॅग उघडल्या होत्या. मात्र एअरबॅग उघडून ही बसलेल्या जागेवरच एकाचा मृत्यू झाला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघातkolhapurकोल्हापूरDeathमृत्यू